मुंबई -Priyanka Chopra's mom Madhu Chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी रविवारी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. सध्या या जोडप्याच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर समोर आली आहेत. या फोटोमध्ये तेे खूप सुंदर दिसत आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा बोलताना दिसत आहे.
मधू चोप्राने दिली प्रतिक्रिया :मधू चोप्रा यांनी या लग्नाला उपस्थित राहून लग्नाचा आनंद घेत जोडप्याला आशीर्वाद दिला. परिणीतीच्या लग्नासोबतच प्रियांका चोप्राच्या आगमनाचीही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. लग्नाच्या शेवटच्या क्षणापर्यंत असे वाटत होते की कदाचित ती बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी या लग्नाला येईल, पण तसे झाले नाही. दरम्यान, आता मधु चोप्रानं प्रियांका रागनिती यांच्या लग्नाला अनुपस्थित असल्याचे कारण सांगितले आहे. मधु चोप्रा यांचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मधु चोप्रा यांना पापाराझी परिणीतीच्या लग्नाबद्दल विचारताना दिसत आहे. पापाराझीनं मधू यांना विचारलं, 'प्रियांकाजी लग्नाला का आली नाही ? 'यावर त्यांनी सांगितलं ती कामात व्यस्त आहे म्हणून आलेली नाही'. यानंतर त्यांना विचारण्यात आले की, लग्न कसे होते आणि परिणीती लग्नाच्या ड्रेसमध्ये कशी दिसत होती? यावर मधु यांनी म्हटलं, 'लग्न खूप छान झालं आणि परिणीती नेहमीच सुंदर दिसते आणि लग्नात ती खूप छान दिसत होती.' त्यानंतर पापाराझीनं मधु यांना विचारलं, की तुम्ही भेटवस्तूबद्दल दिली का ? त्यानंतर त्यांनी सांगितलं की, काही भेटवस्तू दिली नाही मी त्यांना आशीर्वाद दिला. याशिवाय प्रियांका चोप्रानं परिणीतीच्या पोस्टवर इमोजीसह 'माझे आशीर्वाद नेहमीच' अशी प्रतिक्रिया दिली आहे.