मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. परिणीती चोप्रा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे फार चर्चेत होती. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या डेटिंगच्या अफवांना अखेर त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांसह पूर्णविराम मिळाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात ग्लोबल आयकॉन स्टार म्हणजेचं परिणीतीची मोठी चुलत बहीण, प्रियांका चोप्रा जोनास या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. परिणीतीला अनेकदा राघवसोबत मीडियाने स्पॉट केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका 13 मे रोजी सकाळी दिल्लीत पोहोचेल.
अभिनेत्री परिणीती चोप्राचा साखरपुडा :'प्रियांका एक लहान मुक्काम करणार आहे. या प्रसंगी प्रियंकाने आपल्या बहिणीसाठी स्वतःचे काम देखील थांबवले आहे. सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार तिचा नवरा निक जोनास तिच्यासोबत येण्याची अपेक्षा नाही. मात्र ती तिच्या मुलीला, सोबत आणू शकते. परिणीती आणि राघव लवकरच कॅनॉट प्लेसजवळील कपूरथला हाऊसमध्ये पारंपारिक पद्धतीने ऑक्टोसबरमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. परिणितीच्या साखरपुड्यात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा देखील उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात परिणिती कौटरियरने तयार केलेला भारतीय पोशाख परिधान करेल. परिणीती आणि राघव हे सारख्या रंगाचे कपडे परिधान करेल ही अपेक्षा केली जात आहे.