मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमी दिसत असली तरीही सतत चर्चेत असते. कधी ती तिच्या आउटफिट्समुळे तर कधी तिच्या परदेशी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत राहते. सध्या ती बल्गारी कंपनीच्या दागिन्यांची जाहिरात करताना दिसत आहे. अलीकडेच या कार्यक्रमातून तिचा गॉर्जियस आणि बोल्ड लूक समोर आला. आता प्रियांका चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण म्हणजे तिचा 22 वर्षांपूर्वीचे बिकिनीमधले फोटोशूट.
प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी बिकिनीमधील तिचे 22 वर्षांपूर्वीचे बीच फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोंमधील प्रियांका चोप्रा तेव्हा १८ वर्षांची होती. हे फोटोशूट २००० मधील नोव्हेंबर महिन्यातील आहे जेव्हा ती १८ वर्षांची होती.
या फोटोतील प्रियांका चोप्राला ओळखणे कठीण आहे. गेल्या 22 वर्षात प्रियांका चोप्राच्या रुपात खूप बदल झाला आहे. आता चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्रियंका चोप्राच्या या फोटोला पसंती देत आहेत.