महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra And Malti Marie : प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरीनं मित्रांसह केला एन्जॉय ; फोटो केले शेअर... - Priyanka Chopra drops adorable pictures

Priyanka Chopra And Malti Marie : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अलीकडेच मुलीसोबत एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मालती ही आपल्या मित्रांसह मस्ती करताना दिसत आहे.

Priyanka Chopra And Malti Mari
प्रियांका चोप्रा आणि मालती मेरी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 4:04 PM IST

मुंबई Priyanka Chopra And Malti Marie : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती मुलगी मालती मेरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वी प्रियांका बहुतेकदा मालतीचा चेहरा लपवायची. मात्र आता ती बिनधास्तपणे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान आता पुन्हा एकदा प्रियांकानं मालतीचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती आपल्या मित्रांसह खेळताना दिसत आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मित्रांसह डेट खेळा' हे कॅप्शन तिनं पहिल्या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये प्रियांका खूप खूश दिसत आहे. मालती मेरी दुसऱ्या फोटोमध्ये प्ले टबमध्ये बसून तिच्या मित्रांसोबत मजा करत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या मित्रांसह गाडीत बसून आहे.

प्रियांका चोप्रा आणि मालती मेरी

प्रियांका चोप्राने केली पोस्ट :प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी जानेवारी, 2022 मध्ये मुलगी मालती मेरीचे स्वागत केले. त्यांच्या मुलीच्या आगमनाची घोषणा करताना, या जोडप्यानं गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एक विधान शेअर केलं होतं, 'आम्ही सरोगेटद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. हे जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या महत्त्वाच्या काळात आम्हाला गोपनीयता हवी आहे. खूप खूप धन्यवाद'. अशी पोस्ट त्यांनी केली होती. यापूर्वी देखील प्रियांकानं निक आणि मालतीचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो चाहत्यांना खूप आवडला होता या फोटोमध्ये निक हा मालतीला बुक घेऊन कथा सांगत होता.

प्रियांका चोप्रा आणि मालती मेरी

प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट :प्रियांका चोप्राचं हे वर्ष खूप व्यग्र होतं. ती 'सिटाडेल' आणि 'लव्ह अगेन'मध्ये दिसली होती. आता ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती बॉलिवूडमध्ये फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Aamir khan And Junaid khan : आमिरचा मुलगा जुनैद खान झळकणार साऊथ अभिनेत्री साई पल्लवीसोबत...
  2. HBD Ayushmann Khurrana: 'ड्रीम गर्ल 2'मध्ये पूजा बनून आयुष्मान खुरानानं जिंकली लोकांची मनं; वाचा आजच्या या बर्थडे बॉयची रियल कहाणी...
  3. Jawan Box Office Collection day 8 : 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर छापत आहे नोटा....

ABOUT THE AUTHOR

...view details