मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लग्न झाल्यापासून आपापल्या कामात गुंतलेले आहेत. कितीही दिवस दूर राहावे लागले तरी दोघेही कामात कधीच तडजोड करत नाहीत. आता प्रियांका आणि निक यांनी त्यांच्या प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या जोडप्याने अॅक्टिव्हवेअर ब्रँडशी हातमिळवणी केली आहे. तसेच, या ब्रँडसाठी प्रियांका आणि निक यांनी त्यांच्या अॅक्टिव्हवेअरमधील फोटोशूट केले आहे, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
प्रियंका चोप्राने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे की तिने परफेक्ट मोमेंट नावाच्या ऍक्टिव्हवेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ती पती निक जोनाससोबत जोडीदार बनली आहे. ही पोस्ट शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले आहे की, ''हा दिवस आमच्यासाठी खास आहे. आम्हाला परफेक्ट मोमेंट कुटुंबात सामील होण्याचा अभिमान आहे. यामध्ये आमची भूमिका स्ट्रॅटेजिस्ट, गुंतवणूकदार आणि सल्लागाराची असेल.''