महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Prabhas viral photo : साऊथ स्टार प्रभासचे धमाकेदार फोटो व्हायरल... - प्रोजेक्ट के

सॅन दिएगो कॉमिक-कॉनमधून टॉलिवूड स्टार प्रभासचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रभास या फोटोमध्ये खूप खास दिसत आहे. चला तर बघुया प्रभासचे फोटो.....

Prabhas
प्रभास

By

Published : Jul 20, 2023, 4:37 PM IST

मुंबई :'प्रोजेक्ट के' लॉन्च होण्याआधी प्रभासने सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यानची काही फोटो प्रभासची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. प्रभासने काही फोटो आपल्या चाहत्यासोबत देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खूप सुंदर दिसत आहे.

एसडीसीसीमध्ये सादर होणारा पहिला भारतीय चित्रपट :सॅन दिएगो कॉमिक-कॉनमधील टॉलिवूड स्टार प्रभासचे काही खास फोटो ट्विटर हँडलवर समोर आले आहेत. फोटोमध्ये प्रभास पूर्ण ब्लू लूकमध्ये दिसत आहे. त्याने त्याच्या नेव्ही ब्लू टी-शर्टला रॉयल ब्लू ब्लेझरसह पेअर केले आहे. या लूकमध्ये तो जबरदस्त दिसत आहे. या वर्षी सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC)मध्ये सादर होणारा 'प्रोजेक्ट-के' हा पहिला भारतीय चित्रपट आहे. 'प्रोजेक्ट-के' चित्रपटाची टीम आधीच याठिकाणी पोहोचली आहे. या कार्यक्रमादरम्यान प्रभासने खूप स्टायलिश अंदाजात एन्ट्री केली.

प्रभासचा फर्स्ट लूक रिलीज : वैजयंती मुव्हीज निर्मित या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी हे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाच्या मेकर्सनी बुधवारीच प्रोजेक्ट-के मधून प्रभासचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. या चित्रपटामध्ये प्रभासचा लूक खूपच भारी आहे. दरम्यान, वैजयंती मूव्हीजने अलीकडेच प्रभास आणि राणाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे डोंगर दऱ्यांमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. हा चित्रपट खूप जबरदस्त असणार असे दिसत आहे. कारण या चित्रपटामध्ये प्रभास हा त्यांच्या चाहत्यांना वेगळ्या अंदाजात रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट प्रभाससाठी फार महत्वाचा असणार आहे, कारण त्याचा यापूर्वी आदिपुरुष फ्लॉप झाल्यामुळे त्याला त्याचे स्टारडम परत मिळवायचे आहे.

प्रभासचा वर्क फ्रंट : प्रभाससाठी २०२३ काही खास नाही. प्रभास हा साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात मोठा स्टार आहे. त्याने यापूर्वी अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहेत. 'प्रोजेक्ट-के' व्यतिरिक्त प्रभासकडे केजीएफ (KGF) फेम दिग्दर्शक प्रशांत नीलचा 'सालार' हा चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट रूपेरी पडद्यावर रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. Manipur sexual violence : अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकरने मणिपूर लैंगिक अत्याचार विरुद्ध केला संताप व्यक्त...
  2. Netflix sharing in India : भारतात पासवर्ड शेअरिंग करण्यावर नेटफ्लिक्सची बंदी
  3. Vatsal Sheth And Ishita Dutta : इशिता दत्ता आणि वत्सल सेठच्या घरी पहिल्यांदाच हलणार पाळणा, झाली पुत्ररत्नाची प्राप्ती

ABOUT THE AUTHOR

...view details