मुंबई- 'बाहुबली' स्टार प्रभासच्या आगामी 'सालार: भाग १ - सीझफायर'चा टीझर खरोखरच भारतीय प्रेक्षकांसाठी आश्चर्यचकित करणारा होता. गेल्या काही दिवसापासून या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाभोवतीचे आकर्षण वाढत चालले आहे. या चित्रपटाबद्दल अधिक तपशील अथवा इतर बाबी गुलदस्त्यात असल्या तरी यात प्रभास आंतरराष्ट्रीय माफियांशी निकराचा लढा देताना दिसणार आहे.
गेल्या महिन्यात ६ जुलै रोजी 'सालार: भाग १ - सीझफायर' चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली. यातील नेत्रदीपक दृष्ये, कथानकाची पद्धत आणि निर्मिती मुल्ये यातून एक भव्यता पाहायला मिळाली. टीझर पाहून या चित्रपटात आंतरराष्ट्री माफिया टोळीचे आपआपसातील संघर्षाची झलक पाहता आली. जंगलात हिस्त्र प्राणी असतात पण ज्युरासिक पार्कमध्ये त्याहूनही भयानक प्राणी असतो, असे सांगताना प्रभासची एन्ट्री होते, यावरुन त्याच्या व्यक्तिरेखेची एक झलक पाहायला मिळाली होती.
'सालार : भाग १ - सीझफायर'च्या टीजरमध्ये सालारचा नायक असलेला रिबेल स्टार प्रभास आंतरराष्ट्रीय माफियांशी बाहुबली स्टाईलने संघर्ष आणि गुन्हेगारांशी तो दोन हात करताना दिसले, याचा प्रत्यय येतो. यामुळे या चित्रपटाचा कॅनव्हस मोठा असल्याचे आपल्या लक्षात येते. या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नीलने यापूर्वी 'केजीएफ' बनवला होता. त्या चित्रपटापेक्षाही 'सालार' अधिक भव्य बनवण्याचे लक्ष्य त्याने समोर ठेवले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही प्रभासचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरू शकतो असा विश्वास निर्मांत्यांना वाटतो.
या टीझरमध्ये माफिया टोळीने टिनू आनंदवर बंदुका रोखल्याचे दिसते. हे लोक भारतीय गुंड नसल्यामुळे टिनू आनंद सोप्या इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करतो. यात सर्वांना प्रभासच्या व्यक्तिरेखेकडून किती गंभीर धोका आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रभासचे पात्र हे सर्वांना पुरून उरणारे आणि तडाखेबंद अॅक्शन व स्टंट करताना दिसेल याची खात्री पटते.
प्रभास या माफिया टोळीशी कसा भिडतो, त्यांना संपवून तो कसा नेता होता, तो या गुन्हेगारी वर्तुळात कसा येतो हे, या चित्रपटात मनोरंजक पद्धतीने पाहता येणार आहे. या चित्रपटातील प्रभाससचा अवतार अभूतपूर्व असणार आहे. यासाठी दिग्दर्शिक प्रशांत नीलने उत्कंठावर्धक व्हिज्युअल, एक धक्कादायक आणि सस्पेन्स-पॅक बॅकग्राउंड स्कोअर आणि सुपरस्टारसाठी एक भव्य कॅनव्हास निर्माण केला आहे. त्याचा हा आजवरचा सर्वात महत्त्वकांक्षी चित्रपट असणार आहे.