मुंबई- प्रभासचा बहुप्रतीक्षित 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचा पहिला ट्रेलर अमेरिकेत सॅन दिएगोमध्ये होणाऱ्या भव्य इव्हेन्टमध्ये लॉन्च होणार आहे. त्यामुळे जगभरातील प्रभासचे चाहते भरपूर उत्सुक आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्चच्या आदल्या दिवशी या चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यात प्रभासने आपले केसांचा बुचडा बांधल्याचे दिसत असून त्याची दाढी वाढलेली आहे.
प्रभास यामध्ये योद्ध्यासारखे कपडे परिधान केलेला दिसत आहे आणि त्याने सुपर हिरो प्रमाणे लँडिंग केल्याचे फोटोत दिसत आहे. आजूबाजूला सर्वत्र मोठा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. यावरुन प्रभास संकटातून लोकांचा बचाव करत असल्याची पार्श्वभूमीवर हा चित्रपट सेट करण्यात आला असल्याचा अंदाज लावता येतो. असे असले तरी काही नेटिझन्सना त्याचा हा अवतार पसंत पडलेला दिसत नाही.
आपली नापसंती व्यक्त करण्यासाठी नेटिझन्स प्रभासच्या या लूकवर ट्रोल करताना दिसत आहेत. काही जणांनी याचे एडिटिंग निकृष्ठ असल्याची टीका केली आहे, तर काहींनी याची तुलना आदिपुरुषशी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नेटिझन्सने टीकेचा भडिमार केल्याचे दिसन येत आहे. ट्विटरवर याबद्दल चिक्कार प्रतिक्रिया मिळत असून सोशल मीडियावर लोकांनी पोस्टरविषयीची मते दिली आहेत. एकाने, 'आदिपुरुष २.०' असे म्हटलंय. तर दुसऱ्याने, 'नो निगेटिव्हिटी मगर ये है क्या?? मुझे समझ नही आ रहा क्या मुझे उम्मीद छोड देनी चाहिए या उम्मीद रखनी. आदिपुरुष की तरह फिरसे डिसअपॉइंट हो जाऊं.'
यापूर्वी दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक प्रसिद्ध झाला होता. 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट डिस्टोपियन मूव्ही असल्याचे संगितले जाते. हा चित्रपट हिंदू देव विष्णूच्या पुनर्जन्माबद्दल असल्याचे व दुष्ट शक्तीपासून विश्वाचे रक्षण करणाऱ्या हिरोबद्दलची कथा असल्याचे निर्माता अस्वानी त्त यांनी म्हटले होते. प्रभास आदिपुरुष चित्रपटात राघव ही पौराणिक व्यक्तीरेखा साकारताना दिसला होता. याही चित्रपटात तो देवतेचा अवतार होऊन झळकणार आहे. 'प्रोजेक्ट के' चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हाएक भव्य भारतीय सायन्स फिक्शन चित्रपट आहे.