मुंबई- सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नानंतर, चाहते आता बाहुबली स्टार्सकडून मोठ्या घोषणेची वाट पाहत आहेत. अलीकडे, क्रिती सॅनॉन आणि प्रभास त्यांच्या कथित नात्याला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी सज्ज असल्याच्या अफवा पसरत आहेत. लेटेस्ट चर्चेमध्ये असेही समजते आहे की हे जोडपे त्यांच्या एंगेजमेंटसाठी मालदीवला जाणार आहेत.
वृत्तानुसार, प्रभास आणि क्रितीच्या एंगेजमेंटच्या अफवा स्वयंघोषित समीक्षक उमेर यांनी खुलासा केल्यानंतर पसरल्या होत्या. दोघेही मालदिवमध्ये एंगेजमेंट करणार असल्याची ही चर्चा होती. इतकंच नाही तर उमेरने क्रिती आणि प्रभास यांची मालदीवमध्ये डेस्टिनेशन एंगेजमेंट होणार असल्याचा खुलासाही केला होता.
उमेरचे ट्विट व्हायरल होणे निश्चितच होते कारण प्रभासचे चाहते त्यांच्या आवडत्या स्टारला बोहल्यावर चढताना पाहण्याची अपेक्षा ठेवून आहेत. प्रभासच्या आयुष्यात जोडीदार यावा यासाठी ते आतुरतेने वाट पाहत आहेत. बाहुबली स्टारचे चाहते कदाचित प्रभासच्या टीमने एंगेजमेंटच्या अफवांवर केलेले भाष्य पाहून पाहून निराश झाले असतील.
प्रभासच्या टीमच्या म्हणण्यानुसार, उमेरच्या दाव्यांमध्ये तथ्य नाही. प्रभास क्रितीच्या प्रेम प्रकरणात कोणतेही तथ्य नाही, त्या दोघांमध्ये मैत्री आहे त्या पलिकडे काहीच नाही. प्रभास आणि क्रिती हे फक्त मित्र आहेत. त्यांच्या एंगेजमेंटच्या बातम्या खर्या नाहीत," असे प्रभासच्या टीमने वेबलॉइडला सांगितले.