हैदराबाद :चित्रपट निर्माते मणिरत्नम यांचा पोन्नियिन सेल्वन 2 आठवड्याच्या दिवशीही प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचत आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 250 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या थिएटर रनसाठी हे खूप सकारात्मक संकेत आहे. ऐश्वर्या राय बच्चन स्टारर चित्रपटाने भारतात अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मंगळवारी १० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई: भारतीय बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाचे पहिल्या दिवशी 24 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 26 कोटी 2 लाख रुपये कमावले. PS2 ने तिसऱ्या दिवशी 30 कोटी 3 लाख रुपयांची कमाई केली. चौथ्या दिवशी हा आकडा 23 कोटी 25 लाख रुपये झाला. अशाप्रकारे रिलीजनंतर पहिल्या 4 दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 103 कोटी 75 लाखांची कमाई केली आहे.
एकूण जगभरातील संकलन किती होते?यामध्ये केवळ तामिळ व्हर्जनच्या माध्यमातून चित्रपटाने 80 कोटी 38 लाखांची कमाई केली. हिंदी व्हर्जनमधून चित्रपटाने आतापर्यंत 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनचा विचार केला तर या चित्रपटाचे आतापर्यंत एकूण 212 कोटी 35 लाख रुपयांचे कलेक्शन झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले. नुकतीच अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीही या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती.
काय आहे चित्रपटाची कथा, का झाला सुपरहिट ?चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर चित्रपटात चोल राजवटीचा उदय आणि अस्त दाखवण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. तेव्हापासून चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. या चित्रपटाचा दुसरा भागही सुपरहिट ठरल्यानंतर आता निर्माते या चित्रपटाचा तिसरा भागही आणणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की दक्षिणेकडील उद्योग मूळ कथांच्या आधारे सतत जिंकत आहे.
हेही वाचा :Sonam Bajwa : सोनम बाजवाचा गौप्यस्फोट, अनन्या पांडे आणि सारा अली खानला करण जोहरमुळे मिळते काम