हैदराबाद : बॉलिवूडचा बादशाह 'शाहरुख' खान 'पठाण' या चित्रपटाद्वारे चित्रपट जगतात राज्य करत आहे. शाहरुख खान 'पठाण' चित्रपटातून चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर परतला आणि त्याने असा धमाका केला की त्याच्या समीक्षकांची तारांबळ उडाली. 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट अजूनही पडद्यावर कायम आहे आणि 15 मार्च रोजी म्हणजेच आज चित्रपट प्रदर्शित होऊन 50 दिवस झाले आहेत. आता तुम्ही जर शाहरुख खानचे चाहते असाल आणि अजून 'पठाण' चित्रपट पाहण्याची संधी मिळाली नसेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही. 'पठाण' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटगृहात 50 दिवस पूर्ण :मीडिया रिपोर्ट्सनुसार 'पठाण' चित्रपटाचे निर्माते चित्रपटगृहात 50 दिवस पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. अशा परिस्थितीत, बातमी आली आहे की 'पठाण' चित्रपटाचा 22 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर डिजिटल प्रीमियर होणार आहे. ओटीटीवर 'पठाण'ची विस्तारित आवृत्ती दाखवली जाईल, ज्यामध्ये चित्रपटातील हटवलेले दृश्यही दाखवले जातील. या चित्रपटाने जगभरात 1140 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. पठाण' चित्रपट अजूनही चित्रपटगृहात सुरू आहे. शाहरुख खानला 'पठाण' द्वारे त्याचे हरवलेले स्टारडम पुन्हा मिळाले आहे. आता तो त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जवान या चित्रपटाविषयी बोलले जात आहे की, हा 2 जून 2023 रोजी नव्हे तर चालू वर्षाच्या या महिन्यात प्रदर्शित होणार आहे, परंतु अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.