मुंबई - Parineeti Chopra Raghav Reception : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे 24 सप्टेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकजण त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान आता लग्नानंतर हे जोडपे त्यांच्या जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत. दरम्यान आता सध्या त्यांच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर लीक झाली आहे.
रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका लीक : राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या रिसेप्शन पार्टीची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्डनुसार राघव आणि परिणीतीची रिसेप्शन पार्टी 30 सप्टेंबरला चंदीगडच्या ताज हॉटेलमध्ये आयोजित केली जाणार आहे. यानंतर हे कपल दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनही देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील रिसेप्शनला राजकीय जगतातील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत, तर मुंबईतील पार्टीत बॉलिवूड स्टार्सचा मेळा पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर परिणीती ही दिल्लीत तिच्या सासरच्या घरी पोहोचली आहे.