मुंबई - Parineeti chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांचा विवाह 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे झाला. तेव्हापासून हे जोडपे खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विवाहाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. परिणीतीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिचा मालदिवचा आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. लग्नानंतर परिणीती ही कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेली होती. तिनं इंस्टाग्रामवर तिच्या व्हेकेशनचे फोटो यापूर्वी शेअर केले होते. यावेळी तिनं सहलीचा खूप आनंद घेत होता. या सहलीला तिच्यासोबत राघव चड्ढा हे आले नव्हते.
परिणीती चोप्रा राजकारणात येईल ? :परिणीती नुकतीच वडोदरा येथील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिला मुलाखतीत विचारण्यात आलं की, अभिनयातून राजकारणात येण्याच्या योजनांबद्दल तिनं काय विचार केला आहे. यावर तिनं उत्तर देत म्हटलं, "आमच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य मी तुम्हाला सांगते. राघव यांना बॉलीवूडबद्दल काहीही माहिती नाही आणि मला राजकारणाबद्दल काहीही माहिती नाही! त्यामुळे तुम्ही मला या क्षेत्रात येताना पाहाल असं मला वाटत नाही. आमचे जीवन सार्वजनिक असले तरी, आम्हाला संपूर्ण देशातून इतके प्रेम मिळेल याची कल्पना नव्हती. मला वाटते की तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर वैवाहिक जीवन सर्वोत्तम होते."