महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Parineeti Chopra And Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाने लपविला चेहरा... - परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाने लपविला चेहरा

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे काल रात्री मुंबईत वांद्रेमध्ये स्पॉट झाले. जेव्हा पापाराझीची नजर त्यांच्यावर गेली त्यानंतर या जोडप्याने चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला.

Parineeti Chopra And  Raghav Chadha
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा

By

Published : Jul 13, 2023, 12:42 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही राघव चढ्ढासोबत साखरपुडा केल्यापासून फार जास्त चर्चेत असते. परिणीती आणि राघव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनेकदा हे जोडपे एकत्र दिसतात. आता पुन्हा एकदा हे जोडपे एकत्र स्पॉट झाले आहे. हे जोडपे काल रात्री वांद्रे इथे दिसले. यावेळी दोघे एकत्र कारमध्ये होते. जेव्हा या दोघांना पापाराझीने पाहिले तेव्हा या जोडप्याने आपला चेहरा लपवला. हे जोडपे वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहे. परिणीतीचे चाहते तिच्या लग्नाची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. हे दोघे हिवाळ्यात लग्न करत असल्याचे समजत आहे.

साखरपुड्यानंतर मुक्तपणे फिरणारे जोडपे :साखरपुडा झाल्यानंतर हे जोडपे फार मुक्तपणे फिरताना दिसतात. परिणीतीला अनेकदा राघवसोबत पाहिले गेले आहे. साखरपुडा आधी ती लंचवर तर कधी डिनर डेटवर राघवसोबत गेली होती. त्यानंतर दोघे आता नुकतेच लंडनमध्ये लग्नाची शॉपिंग करताना दिसले.

परिणीतीचा साखरपुडा : परिणीतीने चालू वर्षाच्या मे महिन्यात दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये कुटुंबीय आणि काही खास नातेवाईकांच्या उपस्थित राघवसोबत एंगेजमेंट केली. या साखरपुड्यात अनेक राजकारणी लोक आले होते. याशिवाय या साखरपुड्यात अनेक सेलेब्रिटी देखील आले होते. या साखरपुड्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील आली होती.

कुठे होऊ शकते लग्न :परिणीती आणि राघव यांना उदयपूरमधील ओबेरॉय उदयविलास आवडला आहे. ही मालमत्ता पिचोला सरोवराच्या काठावर वसलेली आहे. या हॉटेलमध्ये आलिशान बाग आहे. याशिवाय हे हॉटेल विस्तीर्ण लँडस्केपमध्ये पसरलेली आहे. तसेच हे जोडपे फार आधी उदयपूरमध्ये याठिकाणाला भेट देण्यासाठी गेले होते. याशिवाय त्यांनी बाकी अनेक हॉटेल देखील यावेळी पाहिले होते.

वर्कफ्रंट : परिणीतीच्या वर्कफ्रंटवर बोलायचे झाले तर ती लवकरच चमकीला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटच्या तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिलजीत दोसांझ देखील दिसणार आहे. चमकिला हा चित्रपट पंजाबमधील सर्वात लोकप्रिय गायक अमरसिंग चमकिलाच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ हा गायक अमरसिंग चमकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2 : अक्षय कुमारचा चित्रपट 'ओ माय गॉड २' वादाच्या भोवऱ्यात, सेन्सॉर बोर्डची समिती करणार परीक्षण
  2. classic Bollywood films remake : बावर्ची, मिली आणि कोशिश या १९७० मधील क्सासिक चित्रपटांचा होणार रिमेक
  3. Kaalkoot teaser : रोमांचक थ्रिलर कालाकोट टीझर, पाहा अ‍ॅक्शन मुडमधील विजय वर्मा

ABOUT THE AUTHOR

...view details