मुंबई -आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक दिग्दर्शक अशा विविध जबाबदाऱ्या निभावल्यानंतर शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट करत आहेत. यश मनोहर सणस त्यांच्या यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने "जिप्सी" या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचा पुण्यात नुकताच मुहूर्त करण्यात आला. या ‘जिप्सी’ चित्रपटातून बालकलाकार स्वराली कामथे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दोनशे मुलींमधून स्वरालीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.
सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी पुणे येथे जिप्सी या आगामी सिनेमाचा मुहूर्त नगरसेवक राजेंद्र आबा शिळीमकर यांच्या हस्ते संपन्न झाला. ज्येष्ठ पत्रकार, शंकर महाराजांचे सेवकरी नानासाहेब नायडू, समाज सेवक श्रीनिवास (भैय्यासाहेब) निगडे, चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे, निर्माते यश मनोहर सणस, कार्यकारी निर्माते मंगेश भीमराज जोंधळे, व्यवस्थापक विजय मस्के, साउंड डिझायनर विकास खंदारे, बालकलाकार स्वराली कामथे उपस्थित होते.