मुंबई- दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाणे मिळवणारे भारतीय चित्रपटातील पहिले गाणे ठरले. पुरस्कार स्वीकारताना, संगीतकार एमएम कीरावानी यांनी आपल्या भाषणात दिग्दर्शक राजमौली आणि भारतासाठी अभिमान असल्याचे सांगितले. पुरस्कार जाहीर झाल्याच्या क्षणी टीमच्या उत्साही प्रतिक्रियांचे विविध व्हिज्युअल ऑनलाइन समोर येत आहेत. आरआरआरच्या अधिकृत अकाऊंटने एक क्षण शेअर केला आहे . यात ऑस्करचे सादरकर्ते जेनेलो मअने आणि केट हडसन यांनी आरआरआरचे गाणे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे विजेते म्हणून घोषित करताच दिग्दर्शक आणि त्याचे कुटुंब आनंदाने उडी मारताना दिसत आहे.
आरआरआर टीम ऑस्कर 2023 मध्ये शेवटच्या रांगेत बसलेली दिसली. तो पुरस्कार जाहीर होण्याच्या काही क्षण आधी सर्वांनी आपले श्वास रोखले होते. नाटू नाटूला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाल्यावर दिग्दर्शक राजामौली आणि त्यांच्या टीमचा आनंद उफाळून आला आणि संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्रबोस पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आले! हा क्षण अनुभवत असताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याचे दिसत होते. मागील रांगेतून टाळ्यांच्या गजरात राजामौली आपल्या कुटुंबासह चालत आले. संपूर्ण थिएटर राजामौली यांच्यासाठी टाळ्या वाजवताना उत्सफुर्त दाद देत होते.