मुंबई - Orry :'द आर्चीज'च्या प्रीमियरला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुहाना, खुशी, जान्हवी कपूर, शनाया कपूर आणि अनन्या पांडे, मलायका, अमृता अरोरा अर्जुन कपूर, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे, रणवीर सिंग, कतरिना कैफ, जान्हवी कपूर, बच्चन कुटुंब आणि शाहरुख खानचे कुटुंब या प्रीमियर उपस्थित असून अनेकांच्या नजरा ओरहान अवात्रामणि उर्फ ओरीवर होत्या. ओरीनं 'द आर्चीज' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी स्टायलिश ब्लेझर ब्लेझर परिधान केला होता.
ऑरी झाला ट्रोल: ऑरीच्या गोल्डन ब्लेझरवर पोकेमॉनचं प्रिंट होतं. ऑरीनं त्याच्या सिग्नेचर हेअरस्टाइलसह प्रीमियरला हजेरी लावली होती. या प्रीमियरमध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. प्रीमियरदरम्यान ऑरीनं अनेक सेलेब्ससोबत पोझ देऊन फोटो काढली. सध्या त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऑरीचे फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेकजण त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. ऑरीच्या व्हायरल झालेल्या फोटोवर एका युजरनं कमेंट करत लिहिलं, ''हा माणूस इतका का प्रसिद्ध आहे हे मला समजत नाही''. दुसऱ्या एकानं लिहिलं की, 'सेलिब्रेटी अशा प्रकारे पोझ कसे देऊ शकतात? या माणसासोबत''. आणखी एकानं लिहिलं, ''बस भाऊ, मला हा ओरी आता बघायची नाही''. अशा अनेक कमेंट या फोटोच्या पोस्टमध्ये यूजर करत आहेत.