हैदराबाद- एकेकाळी तामिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नडमधील मुख्य कलाकारांची नायिका असलेली ऐश्वर्या आता रस्त्यावर साबण विकून आपला उदरनिर्वाह भागवत आहे. तिने मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. पण आता ती पोटाची खळगी भरण्यासाठी शौचालये धुण्यासही तयार असल्याचे सांगते.
एका ऑनलाइन माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या भास्करने सांगितले की, तिच्याकडे नोकरी नाही, पैसा नाही आणि आता ती रस्त्यावर साबण विकून उदरनिर्वाह करत आहे.
चित्रपटांमधील तिच्या पीक टाइमनंतर, ऐश्वर्याने अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. मात्र, ती फेव्हरेट लिस्टमधून बाहेर पडली आणि काही काळापासून मनोरंजन क्षेत्राच्या बाहेर आहे. आर्थिक अडचणींमुळे तिला उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर साबण विकावे लागत आहे.