मुंबई :अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' ११ ऑगस्ट रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज झाला. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी अभिनीत 'ओह माय गॉड २' ची बॉक्स ऑफिसवर सतत धूम सुरू आहे. 'ओह माय गॉड २' हा चित्रपट 'गदर २'पेक्षा कमी कमाई करत आहे. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. 'ओह माय गॉड २' देशांतर्गत चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटानं दहाव्या दिवशी १०० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रविवारी म्हणजेच १०व्या दिवशी १२.०७ कोटीची कमाई केली आहे. रिलीज झाल्यापासून नऊ दिवसांत या चित्रपटानं १०१.६१ कोटीचा व्यवसाय केला होता. त्यानंतर आता दहाव्या दिवशी या चित्रपटाचं एकूण कलेक्शन ११४.३१ कोटी झालं आहे.
'ओह माय गॉड २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : या चित्रपटातील अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान पंकज त्रिपाठीनं सांगितलं की, हा रोल त्याला अक्षयमुळे मिळाला. यासोबत त्यानं पुढे सांगितलं की, तो अक्षय कुमारचा खूप आदर करतो. 'ओह माय गॉड २' चित्रपटाचा ओपनिंग आकडा १०.२६ कोटी रुपये होता. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 'ओह माय गॉड २'ने ८५.०५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं शुक्रवारी ६.०३ कोटी, शनिवारी १०.५३ कोटी आणि रविवारी १२.७० कोटी कमावले आहे.