महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

OMG 2 Box Office Collection day 6 : बॉक्स ऑफिसवर 'ओह माय गॉड २'ने सहाव्या दिवशी केली 'इतकी' कमाई.... - ओएमजी २ बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड २' हा चित्रपट सहाव्या दिवशी काही कमाल करू शकलेला नाही. देशांतर्गत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'ओएमजी २'ने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा...

OMG 2
ओह माय गॉड २

By

Published : Aug 17, 2023, 12:01 PM IST

मुंबई :अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा 'ओह माय गॉड २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहे. 'ओएमजी २' ने सुरुवातीपासूनच चांगले कलेक्शन केले होते. दरम्यान आता बुधवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये काहीशी घसरण झाली आहे. तरीही 'ओएमजी २'ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड सोडली नाही. 'ओ माय गॉड २'ची स्पर्धा थेट सनी देओलच्या 'गदर २' चित्रपटासोबत आहे. 'गदर २' या स्पर्धेत 'ओ माय गॉड २'पेक्षा खूप समोर आहे. दरम्यान 'ओएमजी २' चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये ६व्या दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे.

'ओएमजी २ची एकूण कमाई : चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टवर नजर टाकली तर 'ओएमजी २'ने पहिल्या दिवशी १०.२६ कोटीची कमाई केली होती. यानंतर कलेक्शनमध्ये मोठी झेप घेत 'ओएमजी २'ने दुसऱ्या दिवशी १५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १७ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. यासह, 'ओएमजी २'ने पहिल्या वीकेंडला एकूण ४३.११ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली, यानंतर १५ ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली होती, आता १६ ऑगस्ट रोजी 'ओएमजी २' च्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. सॅकनिल्क रिपोर्टनुसार या चित्रपटाने ६ दिवसात आतापर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केले आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'ओएमजी २'ने बुधवारी ७.७५ कोटींचा बॉक्स ऑफिसवर व्यवसाय केला. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'ओएमजी २' चित्रपटाचे एकूण कलेक्शन ८०.०२ कोटींवर गेले आहे.

'ओएमजी २ चित्रपटाचे कलेक्शन रिपोर्ट

१ दिवस - १०.२६ कोटी

२ दिवस -१५.३० कोटी

३ दिवस - १७.५५ कोटी

४ दिवस - १२.०६ कोटी

५ दिवस - १७.१० कोटी

६ दिवस - ७.७५ कोटी

एकूण कलेक्शन - ८०.०२ कोटी

१०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार? : 'ओएमजी २' हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या चित्रपटाने ६ दिवसात जगभरात ११० कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू कमाई करत आहे. 'ओएमजी २'मध्ये सामाजिक संदेश दिला गेला आहे.

हेही वाचा :

  1. Gadar 2 box office collection day 6 : सनी देओल स्टारर 'गदर २' ची 'क्लब ३०० कोटी'च्या दिशेने वाटचाल
  2. Alia Bhatt and Elvish Yadav : एल्विश यादवने आलिया भट्टचेही मन जिंकले, 'आय लव्ह यू'ने दिला प्रतिसाद
  3. Bharat Jadhav new play : भरत येतोय परत, याखेपेस हळव्या भूमिकेतून दाखवणार 'अस्तित्व'

ABOUT THE AUTHOR

...view details