महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

OMG 2 box office collection day 5: 'ओ माय गॉड २' चित्रपटाने केली स्वातंत्र्यदिनी सर्वाधिक कमाई - ओएमजी २ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ५

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांचा 'ओ माय गॉड २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन ५ दिवस झाले आहेत. स्वातंत्र्यदिनी 'ओ माय गॉड २'ने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यत एकूण किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा...

OMG 2
ओ माय गॉड २

By

Published : Aug 16, 2023, 1:03 PM IST

मुंबई:अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी स्टारर 'ओ माय गॉड २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी खूप मोठी झेप घेतली आहे. 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे रविवारच्या तुलनेत मंगळवारी जास्त कमाई झाली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने १०.२५ कोटीची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १५.३० कोटी , तिसऱ्या दिवशी १६.५५ कोटी, चौथ्या दिवशी १२.०६ कोटी कमाई केली होती. दरम्यान आता या चित्रपटाने मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी १८.५० कोटीची कमाई केली आहे. यासह, 'ओ माय गॉड २'ची एकूण कमाई ७३.६७ कोटी रुपयांवर गेली आहे. म्हणजेच रिलीजच्या ५ दिवसांत अक्षय कुमारच्या चित्रपटाने ७० कोटींचा टप्पा पार केला आहे. रिलीज झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक कमाई 'ओ माय गॉड २'ने १५ ऑगस्ट रोजी केली आहे.

'ओ माय गॉड २' चित्रपटाबद्दल :'ओ माय गॉड २' हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या 'ओ माय गॉड' चित्रपटाचा सीक्वल आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चालला होता. 'ओ माय गॉड' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची कहाणी खूप हटके होती. दुसरीकडे 'ओ माय गॉड २'मध्ये पंकज त्रिपाठीला कांती शरण मुद्गल नावाच्या शिवभक्ताच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. तसेच अक्षय कुमार हा महादेवाच्या मेसेंजरच्या भूमिकेत आहे, तर यामी गौतम ही वकिलाची भूमिका साकारत आहे. याशिवाय या चित्रपटात रामायण फेम अरुण गोविल यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तसेच पवन मल्होत्रा ​​यांनी न्यायाधीश म्हणून अप्रतिम काम केले आहे.

सामाजिक संदेश देणारा चित्रपट : 'ओ माय गॉड २' या चित्रपटाची कहानी देखील सामाजिक संदेश देणारी आहे. सध्या रूपेरी पडद्यावर 'ओ माय गॉड २' आणि 'गदर २'मध्ये स्पर्धा आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यामी गौतमने चांगला अभिनय केला आहे . 'ओ माय गॉड २' चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 'ओ माय गॉड २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू कमाई करत आहे.

हेही वाचा :

  1. Jailer Collection Day 6: 'जेलर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला २०० कोटींचा टप्पा पार...
  2. Gadar 2 Box office collection day 5 : सनी देओल स्टारर 'गदर २' ने केला २०० कोटींचा आकडा पार...
  3. Elvish Yadav : एल्विश यादव ठरला 'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता ; अभिषेक मल्हानने पटकविले दुसरे स्थान...

ABOUT THE AUTHOR

...view details