हैदराबाद- Rajamouli compares RGV with Sandeep Ready Vanga : प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटांची तुलना राम गोपाल उर्फ रामू यांच्या चित्रपटांशी केली. 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात राजमौली यांनी दोन दिग्दर्शकांच्या प्रतिभेतील साम्य दाखवून दिलं. सत्या, रंगीला, भूत, रक्त चरित्र आणि यासारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती करुन चित्रपटसृष्टी हादरवून सोडणाऱ्या राम गोपाल वर्मा यांच्या सारखाच दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डीच्या निमित्तानं चित्रपटसृष्टीला मिळाला आहे. राजामौली यांनी केलेल्या कौतुकाची ही व्हिडिओ क्लिप राम गोपाल वर्मानं आपल्या X वर शेअर केली आहे.
कार्यक्रमादरम्यान, राजामौली यांनी अभिनेता रणबीर कपूर आपला आवडता अभिनेता असल्याचं सांगितलं. 'अॅनिमल'च्या या प्री रिलीज इव्हेन्टमध्ये केवळ या चित्रपटाचं प्रमोशन राजामौली यांनी केलं नाही तर तर भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिभांमधील परस्पर प्रशंसा आणि सौहार्द देखील प्रदर्शित केलं. या कार्यक्रमात राजामौली यांनी देखील कबूल केले की तेलुगू प्रेक्षकांचे संदीप रेड्डी वंगा आणि राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमावर अफाट प्रेम आहे. विशेष म्हणजे सर्वच साऊथ इंडियन दिग्दर्शकांना हिंदी चित्रपट बनवणे कठीण जाते. मात्र, राम गोपाल वर्मा आणि संदीप वंगा रेड्डी यांनी बनवलेले चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. दुसरं म्हणजे दोघांकडेही जबरदस्त ठाव घेणाऱ्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या जॉनरचा हातखंडा आहे. दोघांच्याही चित्रपटांचा साऊथ इंडियासह पॅन इंडियामध्ये मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.
यापूर्वी, जेव्हा राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती, आणि यातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता तेव्हा राम गोपाल वर्मानं त्याचं या पुरस्काराचं ऐतिहासिक महत्त्व सांगून कौतुक केल होतं.
दरम्यान, रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या भूमिका असलेल्या 'अॅनिमल' हा आगामी चित्रपट 1 डिसेंबर रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'सोबत या चित्रपटाची रिलीज टक्कर होणार आहे.