मुंबई - कपूर कुटुंबात आता आणखी एका ज्युनियर कपूरची एंट्री होणार आहे. रणबीर कपूरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. 27 जून रोजी सकाळी आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधील दोन फोटो शेअर केले आणि चाहत्यांना तिच्या गर्भवती असल्याची आनंदाची बातमी दिली. यावर आलिया भट्टची नणंद रिद्धिमा कपूर हिने भावाचे अभिनंदन केले असून आता आलिया भट्टची सासू आणि रणबीर कपूरच्या आईनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
खरंतर सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये हौशी फोटोग्राफर्स आधी नीतू कपूरचे अभिनंदन करतात आणि नीतू कपूरने जेव्हा याचे कारण विचारले, तेव्हा पापाराझीने सांगितले की ती आजी होणार आहे. यावर नीतू कपूर थोडीशी हसली आणि त्यांचे आभार म्हणाली.
यानंतर हौशी फोटोग्राफर्सनी नीतूचे ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटासाठी अभिनंदन केले. त्याचवेळी नीतू कपूरने असेही सांगितले की, पहिला 'शमशेरा' आणि 'ब्रह्मास्त्र' आहे. त्यावेळी व्हिडिओमध्ये जाता जाता नीतू कपूर म्हणते की, संपूर्ण जगाला कळले. यावर पापाराझी नीतूला सांगतात की तिची सून आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.