मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी( Sushant Singh Rajput suicide case ) नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोलने आज मसुदा आरोपपत्र विशेष न्यायालयात ( Draft Chargesheet in Court ) सादर केले. आरोपपत्र 33 आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ( Actress and Sushant Girlfriend Riya Chakraborty ) व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. आज हे सर्व आरोपी मुंबई सत्र न्यायालयात न्यायालयासमोर हजर झाले होते.
आरोपपत्र न्यायालयात दाखल : एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात 30 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती आहे. तसेच २०० साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण 33 आरोपींपैकी अद्याप 5 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू आहे, असे एनसीबीने सांगितले.
मोबाईल व इतर महत्त्वाच्या गोष्टींची चौकशी : गेल्या 2020 मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले होते. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ, आरोपींनी स्वतःहून दिलेली माहिती तांत्रिक पुरावे, उदा. मोबाइल कॉल्स, व्हाॅट्सॲप चॅट, बँक खात्यांची माहिती, आर्थिक व्यवहार आणि अन्य कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन खोलवर तपास करण्यात आला, असे तपास यंत्रणेने सांगितले.