नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) पुन्हा एकदा ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर यांना फटकारले आहे. तिने म्हटले की तिला काही झाले तर 'वेलकम' अभिनेता आणि त्याचे 'बॉलीवूड माफिया मित्र' (Bollywood Mafia) जबाबदार असतील. इन्स्टाग्रामवर तिने एक पोस्ट केली आहे. त्याला तिने कॅप्शन दिले, "मला कधी काही झाले तर कळू द्या की #metoo चे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि साथीदार आणि त्यांचे बॉलीवूड माफिया मित्र जबाबदार आहेत! कोण आहेत बॉलीवूड माफिया ?? एसएसआर मृत्यू प्रकरणात ज्यांची नावे वारंवार आली तेच लोक. (लक्षात घ्या की सर्वांचे फौजदारी वकील समान आहेत)."
तनुश्रीने 2018 मध्ये अभिनेता नानांवर 2008 मध्ये त्यांच्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या एका खास गाण्याचे शूटिंग करत असताना तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे नानांनी सर्व दावे फेटाळून लावले होते. तर प्रेक्षकांना तिने यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यास सांगितले होते. 'बॉलिवूड माफियां'ने बनवलेले चित्रपट, असे म्हणत तनुश्रीने तिची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामध्ये, "त्यांचे चित्रपट पाहू नका, त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका आणि त्यांना ट्रोल करा. माझ्या आणि जनसंपर्क बद्दल खोट्या बातम्या लावणाऱ्या सर्व इंडस्ट्रीचे चेहरे आणि पत्रकारांच्या मागे लागा. त्यातील लोकही या मोहिमेमागे आहेत." ...आणि बाय! फिर मिलेंगे".