मुंबई : टॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांच्या यादीत साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता नागा चैतन्यचा समावेश आहे. त्याचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'कस्टडी'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ९ जून रोजी अॅमेझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. बुधवारी या चित्रपट निर्मात्यांनी याबद्दलची माहिती दिली. 'कस्टडी' चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही प्रभू यांनी केले आहे. 'कस्टडी' हा एक तेलुगु फीचर चित्रपट आहे जो देशभर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नागा चैतन्यसोबत क्रिती शेट्टीही मुख्य भूमिकेत आहे.
अॅमेझोन प्राईम : मल्याळम आणि कन्नडमध्ये डब केलेल्या तेलगू आणि तमिळसह हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केल्या जाणार आहे, त्यामुळे प्रेक्षक फार आनंदी आहेत. 'कस्टडी' चित्रपटात चैतन्य शिवाच्या भूमिकेत दिसत आहे, तो एका तरुण हवालदाराची भूमिका या चित्रपटात साकारत आहे. राजू नावाच्या खतरनाक गुन्हेगाराला बंगळुरू न्यायालयात नेण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आली असते . शिवा ज्या व्यक्तीला न्यायालयात घेऊन जात आहे ती व्यक्ती एका शक्तिशाली मंत्र्याविरुद्ध कोर्टात साक्ष देणार असतो. त्यामुळे मंत्री या साक्षीदारासह शिवाला ही निशाणा बनविताना दिसतो. अशा परिस्थितीत शिवा हा गुन्हेगाराला कोर्टात नेऊ शकणार की नाही. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी अॅमेझोन प्राईमवर हा चित्रपट पहा...