मुंबई - Rashmika Mandanna Deepfake Video:रश्मिका मंदान्नानं आपल्या मेहनीच्या जोरावर साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. सध्या रश्मिका तिच्या आगामी अॅक्शन चित्रपट 'अॅनिमल'मुळे चर्चेत असतानाच तिच्याबाबतीत असं काही घडल, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना धक्का पोहचला. रश्मिका मंदान्नाचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यावर नाराजी व्यक्त करत एक ट्विट करून कारवाईची मागणी केली होती. दरम्यान बिग बीनं तिची बाजू घेतल्याबद्दल तिनं आभार मानले आहेत.
रश्मिका मंदान्नानं शेअर केली पोस्ट : रश्मिका मंदान्नाचा व्हिडिओ एआयच्या डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनविण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंदान्ना ही काळ्या रंगाच्या डीपनेक जंपसूटमध्ये दिसत होती. ती लिफ्टच्या दरवाजातून बाहेर येत होती. त्यानंतर खरा व्हिडिओ एक्स हँडलवर शेअर करण्यात आला होता. एआय जनरेट केलेला व्हिडिओवर रश्मिका चांगलीच नाराज झाली. याशिवाय अमिताभ बच्चन देखील रश्मिका मंदान्नाच्या समर्थनार्थ पुढे आले. आता यानंतर रश्मिकानं त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी एक ट्विट केलं आहे.
रश्मिका मंदान्नानं मानलं अमिताभ बच्चनचे आभार : रश्मिका मंदान्नानं सोमवारी संध्याकाळी एक्सवर पोस्ट केली. तिनं डीपफेक व्हिडिओ प्रकरणात बिग बीनं आवाज उठावला याबद्दल त्यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी याप्रकरणी लिहलं होतं की, 'हे कायदेशीरदृष्ट्या मजबूत केस आहे.' यावर रश्मिकानं बिग बींचं आभार मानत पोस्टमध्ये लिहलं, 'माझ्यासाठी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद सर, तुमच्यासारखे नेते असलेल्या देशात मला सुरक्षित वाटते.' अमिताभ बच्चन व्यतिरिक्त, इतर अनेक सेलिब्रिटींनी देखील रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भूमिका घेतली. नागा चैतन्य आणि मृणाल ठाकूरसह इतर अनेकांनीही हे 'निराशाजनक' असल्याचं म्हटलं होतं.
रश्मिका मंदान्ना वर्क फ्रंट :रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय रश्मिका पुन्हा एकदा अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- Tiger 3 Song Ruaan Out: 'टायगर 3'मधील 'रुआन' गाणं प्रदर्शित, पाहा रोमँटिक लिरीकल व्हिडिओ
- Bigg Boss 17 day 23 : नॉमिनेशननंतर बिग बॉसच्या घरात अशांतता, मुनावरनं दाखवला मन्नाराबद्दलचा हळवा कोपरा
- Rashmika Mandanna : मॉर्फ व्हिडिओवर रश्मिका म्हणाली, तंत्रज्ञानाचा गैरवापर भयानक