मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी हीरामंडी नावाच्या मालिकेद्वारे डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. याची घोषणा झाली तेव्हा पासून हा प्रोजेक्ट चर्चेत आहे. भव्य सेट्स आणि अविस्मरणीय पात्रांसह संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचा स्वतःचा जबरदस्त ब्रँड तयार केला आहे. त्यांच्या महत्त्वकांक्षी हीरामंडी मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज आणि मनीषा कोईराला भूमिका साकारणार आहेत.
सोमवारी मनीषा कोईरालाने सोशल मीडियावर एसएलबी आणि मुमताजसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "महापुरुषांच्या सहवासात..मला अशा अद्भुत सर्जनशील लोकांसोबत राहणे आवडते..माझा चेहरा हे सर्व सांगतो.'' हा फोटो पाहिल्यापासून मनिषा कोईरालाआणि मुमताजच्या हीरामंडीमध्ये कास्टिंगबद्दल अटकळ बांधली जात आहे.
भन्साळींची हीरामंडी ही वेब सिरीज ऑनलाइन स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सद्वारे निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाविषयी बोलताना संजय लीला भन्साळी यांनी आधी सांगितले की, चित्रपट निर्माता म्हणून त्यांच्या आजवरच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हे एक महाकाव्य आहे, लाहोरच्या वेश्यांवर आधारित अशा प्रकारची पहिली मालिका असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
चित्रपट निर्मात्यांनी असेही म्हटले होते की हीरामंडी ही एक महत्वाकांक्षी, भव्य आणि सर्वसमावेशक मालिका आहे. आगामी शो स्वतंत्र भारताच्या काळातील वेश्यांच्या कथा असलेली हीरामंडी ही मालिका छुपे सांस्कृतिक वास्तव एक्सप्लोर करेल. मुळात ही कोठ्यांमधील प्रेम, विश्वासघात, उत्तराधिकार आणि राजकारण याबद्दलची मालिका आहे. भन्साळी ट्रेडमार्क लार्जर-दॅन-लाइफ सेट, बहुआयामी पात्रे आणि भावपूर्ण रचना यात पाहायला मिळतील.
हेही वाचा -प्रियांका आणि निक जोनासने समुद्रात अनुभवले रोमँटिक क्षण