मुंबई - Latest box office day 4 : बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा 'थँक यू फॉर कमिंग' आणि अभिनेता अक्षय कुमारचा ' मिशन रानीगंज द ग्रेट भारत रेस्क्यू' हे दोन चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. हे दोन्ही चित्रपट कमाईसाठी बॉक्स ऑफिसवर खूप धडपड करत आहेत. भूमी पेडणेकरच्या या चित्रपटावर निर्मात्यांनी 45 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे आणि कमाईची स्थिती पाहता हा खर्च वसूल करणे आता अशक्य वाटत आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकरशिवाय शहनाज गिल, कुशा कपिला, शिबानी बेदी, करण कुंद्रा आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'मिशन राणीगंज' चित्रपटाबद्दल : दुसरीकडे अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट 55 कोटी रुपयांमध्ये निर्मित झाला असल्याचं बोललं जात आहे. हा चित्रपट 1989 च्या राणीगंज कोलफिल्ड दुर्घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अक्षयनं दिवंगत जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट पाहिजे तशी जादू प्रेक्षकांवर करू शकला नाही. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा व्यतिरिक्त कुमुद मिश्रा, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा, पवन मल्होत्रा, वीरेंद्र सक्सेना आणि शिशिर शर्मा यांच्याही भूमिका आहेत. आता या दोन्ही चित्रपटाचा थिएटरमध्ये सातवा दिवस सुरू आहे. हे चित्रपट सातव्या दिवशी किती कमाई करू शकतील हे पाहूया...
'मिशन राणीगंज'ची कमाई
पहिला दिवस शुक्रवार २.८ कोटी
दुसरा दिवस शनिवार ४.८ कोटी
तिसरा दिवस रविवार 5 कोटी
चौथा दिवस 4 सोमवार 1.5 कोटी
पाचवा दिवस मंगळवार 1.5 कोटी
सहा दिवस बुधवार 1.45 कोटी
सातवा दिवस गुरुवार 1.41 कोटी कमाई करू शकतो