मुंबई : मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ ने १२.३ कोटी रुपयांची प्रभावी कमाई करून बॉक्स ऑफिसवर आपली क्षमता प्रदर्शित केली आहे. चित्रपटाने ६व्या दिवसात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. ६ दिवसांच्या अखेरीस चित्रपटाची कमाई ६८.५० कोटींवर पोहोचली आहे. टॉम क्रूझ हा चित्रपट जगभरात धमाकेदार कमाई करत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते मिशन इम्पॉसिबल -७ने ६व्या दिवशी ५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरेल कारण वींकेडच्या दिवसात हा चित्रपट खूप कमाई करत आहे, त्यामुळे पुढील शनिवार आणि रविवारी चित्रपट्याच्या कमाईचा आकडा हा खूप मोठा असू शकतो.
मिशन इम्पॉसिबल ७ : भारतीय बॉक्स ऑफिसवर इतकी स्पर्धा असूनही, मिशन इम्पॉसिबल ७ हा १०० कोटींचा टप्पा ओलांडण्यासाठी सज्ज आहे. मिशन इम्पॉसिबल ७ लवकरच १०० कोटीच्या कल्बमध्ये जाणार असा अंदाज वर्तविला जात आहे. टॉम क्रूझच्या चित्रपटाचे जागतिक यश देखील लक्षात घेण्यासारखे आहे, कारण मिशन इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट १ने जगभरात सुमारे $२३० - २३५ दशलक्ष इतके प्रभावी वीकेंड कलेक्शन कमावले. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्रिस्तोफर मॅकक्वेरी यांनी केले आहे. मिशन इम्पॉसिबल -७ चित्रपटात सायमन पेग, हेली एटवेल, विंग रेम्स, रेबेका फर्ग्युसन आणि व्हेनेसा किर्बी यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.