मुंबई : 'मिशन इम्पॉसिबल ७' या चित्रपटाची जादू आता बॉक्स ऑफिसवर काम करत नाही आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ख्रिस्तोफर नोलनचा 'ओपेनहाइमर' आणि संगीतमय कल्पनारम्य चित्रपट बार्बी प्रदर्शित झाल्यापासून 'मिशन इम्पॉसिबल ७'ची कमाई कमी होत आहे. टॉम क्रूझचा चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल ७' हा रूपेरी पडद्यावर थोडा मंद गतीने कमाई करत आहे. हा चित्रपट काही दिवसात देशांतर्गत १०० कोटीचा आकडा पार करू शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल ७'चे कलेक्शन 'ओपेनहाइमर' आणि 'बार्बी' हे दोन चित्रपट कमी करत आहेत. हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट रूपेरी पडद्यावर खूप चांगली कमाई करत होता. 'मिशन इम्पॉसिबल ७'चा रिव्ह्यू प्रेक्षकांद्वारे चांगला देण्यात आला आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्क आकडेवारीनुसार, 'मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट वन' म्हणजेच 'मिशन इम्पॉसिबल ७'ने चौवदाव्या दिवशी भारतात १.५ कोटी रुपयांची कमाई असून आता या चित्रपटाची एकूण कमाई ९५.७० झाली आहे.
मिशन इम्पॉसिबल ७ किती कमाई केली : 'मिशन इम्पॉसिबल ७'च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.३ कोटी, दुसऱ्या दिवशी ९ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.१५ कोटी, चौथ्या दिवशी १६ कोटी, पाचव्या दिवशी १७.३ कोटी, सहाव्या दिवशी ५ कोटींची कमाई केली तर दुसरीकडे या चित्रपटाने, सातव्या दिवशी ४.३५ कोटी, आठव्या दिवशी ४ कोटी, नवव्या दिवशी ३.७५ कोटी, दहाव्या दिवशी २.४ कोटी, अकराव्या दिवशी ४.७ कोटी, बाराव्या दिवशी ५ कोटी, तेराव्या दिवशी १.५ कोटी कमावले आहेत.