महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sushant Singh Rajputs sister Shweta : 'प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते', म्हणत सुशांतच्या बहिणीने जागवल्या आठवणी - सुशांत सिंग राजपूत

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या स्मृतिदिनानिमित्य त्याचे चाहते व कुटुंबीय त्याचे स्मरण करत आहेत. सुशांतची बहिण श्वेता सिंग कीर्तीने श्वेताने सुशांतच्या फोटोंचा कोलाज शेअर त्याच्या आठवणी जागवल्या आहेत.

Sushant Singh Rajputs sister Shweta
सुशांतच्या बहिणीने जागवल्या आठवणी

By

Published : Jun 14, 2023, 11:52 AM IST

मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. 14 जून 2023 रोजी सुशांत मुंबईतील राहत्या फ्लॅटमध्ये मृतअवस्थेत आढळला होता. त्याच्या या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का व त्यानंतर निर्माण झालेल्या संशयाच्या गोष्टींमुळे हादरा बसला होता. आज त्याच्या स्मृतिदिनानिमित्य चाहते आणि कुटुंबीय त्याची आठवण काढत आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंग कीर्ती हिने बुधवारी त्याच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त शोक व्यक्त केला. श्वेताने सुशांतच्या फोटोंचा कोलाज शेअर केला आणि आपल्या दिवंगत भावाला एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली अर्पण केली.

ट्विट करत सुशांतच्या बहिणीने लिहिले, 'भाई मी तुझ्यावर प्रेम करते, तुझ्या बुद्धीमत्तेला सलाम करते. मला प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. पण मला माहित आहे की तू आता माझा एक भाग आहेस.... तू माझ्या श्वासासारखाच एक हिस्सा आहेस. त्याच्या काही त्याच्या आवडीच्या स्मृती शेअर करते.'

सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी श्वेताच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला. आपल्या भावावर निस्सीम प्रेम करणाऱ्या श्वेताचे लोक कौतुक करत आहेत. सुशांत हा उत्तम गुण असलेला, सकारात्मक व्यक्ती होता. तो आयुष्यात कोणाशीही भांडला नाही किंवा वाईटही बोलला नाही, याच कारणामुळे आज लोक त्याला आठवत राहतात आणि त्याच्या पाठीशी राहतात, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. श्वेताने खूप सुंदर आणि भावनिक पोस्ट शेअर केली असून तिच्या चळवळीत आम्ही आहोत, असेही काहीजण सांगत आहेत. सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळेपर्यांत आम्ही ठाम राहू असेही काहींनी म्हटलंय.

टेलिव्हिजन मालिकामधून बॉलीवूडमध्ये उत्कृष्ट परिवर्तन घडवणाऱ्या सुशांत सिंग राजपूतचे 14 जून 2020 रोजी निधन झाले. त्याच्या मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय पातळीवर गाजली. त्याच्या मृत्यूनंतर अनेक महिने ठळक बातम्या झळकत राहिल्या. मृत्यूला तीन वर्षे पूर्ण होऊन अद्यापही ठोस न्याय मिळालेला नाही, असे मत त्याच्या चाहत्यांचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details