महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

राम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई - मेरी ख्रिसमस

Merry Christmas Collection Day 1 : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी अपेक्षित कमाई केली नाही. कमाईच्या बाबतीत आता अनेकजणांच्या नजरा शनिवार आणि रविवार या दिवसांवर आहेत.

Merry Christmas Collection Day 1
मेरी ख्रिसमस चित्रपट कलेक्शन डे 1

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 10:09 AM IST

मुंबई- Merry Christmas Collection Day 1 :अभिनेत्री कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट 'मेरी ख्रिसमस' 12 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्री राम राघवन यांनी केलं आहे. हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर असून या चित्रपटाद्वारे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथ स्टार विजय सेतुपती जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांना एकत्र पाहिला मिळाली आहे. 'मेरी ख्रिसमस'ला प्रेक्षकांना पाहिजे तसा प्रतिसाद दिला नसल्याचं दिसत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिस सुरूवात काही विशेष झालेली नाही.

'मेरी ख्रिसमस' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला ? :कतरिना आणि विजयच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकणार नाही असं सध्याचं चित्र दिसत आहे. 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाची पहिल्याच दिवशीची बॉक्स ऑफिसवर कमाई 2.55 कोटीची झाली आहे. चित्रपटाचा वेग असाच सुरू राहिला तर हा चित्रपट फारशी कमाई करू शकणार नाही. 'मेरी ख्रिसमस' हा कतरिनाचा आतापर्यंतचा सर्वात कमी ओपनिंग चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्याची शक्यता कमी आहे. 'मेरी ख्रिसमस' शनिवार आणि रविवारी कमाई करू शकला नाही तर हा चित्रपट फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामील होईल.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटाची स्टार कास्ट : आता 'मेरी ख्रिसमस'च्या निर्मात्यांच्या नजरा या वीकेंडच्या कलेक्शनवर खिळल्या आहेत. या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर कतरिना आणि विजयशिवाय 'मेरी ख्रिसमस'मध्ये राधिका आपटे, आदिती गोवित्रीकर, टिनू आनंद, संजय कपूर, विनय पाठक आणि इतर कलाकार आहेत. राधिकानं या चित्रपटामध्ये कॅमिओ केला आहे. या चित्रपटातील कतरिना आणि विजय यांची केमिस्ट्री प्रेक्षकांवर आपली जादू चालवू शकली नाही. हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 60 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट फ्रेडरिक डार्ड यांच्या फ्रेंच कादंबरीवर आधारित आहे.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर स्टारर रामायण चित्रपटाला होणार सुरुवात, नियोजनबद्ध शूटिंग शेड्यूल तयार
  2. कतरिना आणि विजय सेतुपतीच्या मेरी ख्रिसमसचे नेटिझन्सनी केले स्वागत
  3. 'गुंटूर कारम' पाहणाऱ्या महेश बाबूसह कुटुंबावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details