महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'ब्रह्मास्त्र'मधील 'अंधेरे की रानी' मौनी रॉय, डंख मारण्यासाठी 'नागिन' सज्ज - Actor Ranbir Kapoor

'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील मौनी रॉयचा लूक आणि व्यक्तिरेखा समोर आली आहे. करण जोहरने चित्रपटातील मौनी रॉयची व्यक्तिरेखा काय आहे हे सांगितले आहे.

मौनी रॉय
मौनी रॉय

By

Published : Jun 14, 2022, 10:19 AM IST

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. नुकताच या चित्रपटाशी संबंधित एक टीझर प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख समोर आली आहे. आता या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयचा दमदार लूक समोर आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १५ जूनला रिलीज होणार आहे.

मोशन पोस्टर शेअर करताना करण जोहरने लिहीले आहे की, "कर ले सबको अपने वश में..अंधेरे की रानी है.. ब्रह्मास्त्र को हासिल करना, यह जुनून ने ठानी है." ट्रेलर 15 जून रोजी रिलीज होणार आहे. याआधी आलिया भट्टने शेअर केलेल्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन, रणबीर कपूर आणि मौनी रॉय यांच्यासह सर्वांच्या व्यक्तिरेखा समोर आल्या होत्या. या व्हिडीओमध्ये सर्व कलाकारांची भयंकर रूपे पाहायला मिळत आहेत.

आलिया भट्टने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, 'फक्त 100 दिवसांनी चित्रपटाचा पहिला भाग तुमच्यासमोर येईल.. चित्रपटाचा ट्रेलर 15 जूनला रिलीज होणार आहे. याआधी चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शेवटचे शेड्यूल काशी (वाराणसी) येथे पूर्ण झाले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि मुख्य स्टारकास्ट आलिया भट्ट आणि रणबीर सिंग यांनी शूटिंग संपवून काशी मंदिराला भेट दिली होती. या सर्व सेलिब्रिटींनी येथून सुंदर फोटोदेखील शेअर केले होते.

यापूर्वी आलिया आणि रणबीर जेव्हा वाराणसीमध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा त्यांच्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान आलिया-रणबीर अनेक ठिकाणी शूटिंग करताना दिसले. चित्रपटाचे चित्रीकरण वाराणसीच्या रस्त्यांवर आणि नदीच्या काठावर करण्यात आले आहे.

या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे. अयान, रणबीर आणि आलियाने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी काशीच्या मंदिराला भेट दिली. तिघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिन्ही सेलेब्सच्या गळ्यात फुलांचे हार दिसत होते. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

हेही वाचा -मुक्ता बर्वेची साहसी भूमिका असलेल्या 'वाय' या थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details