लॉस एंजेलिस - Matthew Perry Death : हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी मॅथ्यूनं जगाचा निरोप घेतला. शनिवारी त्याच्या लॉस एंजेलिसच्या घरी बाथटबमध्ये बुडून त्याचा मृतदेह सापडला, असा अमेरिकेच्या माध्यमांनी दावा केला. 1994 ते 2004 या काळात 'फ्रेंडस' या मालिकेमुळे मॅथ्यू पेरीला जगभरात प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमधील विनोदी अभिनयानं त्यानं प्रेक्षकांचे मनं जिंकली. मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमागेचे कारण अद्यापही समोर आले नाही. लॉस एंजेलिस पोलीस त्यांच्या मृत्यूचं कारण सध्या शोधत आहेत.
मॅथ्यू पेरीचा मृत्यू :दरम्यान आता मॅथ्यू पेरीच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेकजन त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. इन्स्टाग्रामवर अभिनेत्री सेल्मा ब्लेअरनं लिहलं, 'माझा सर्वात जुना मित्र. आम्हा सर्वांचं मॅथ्यू पेरीवर प्रेम होते. मी त्याच्यावर खूप प्रेम केले. तो देखील माझ्यावर प्रेम करत होता. मी खचून गेलो आहे. मीरा सोरविनोनं 1994मध्ये मॅथ्यू पेरीसोबत काम केलं होतं, तिनं देखील मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ब्रॉडकास्टर पियर्स मॉर्गन यांनी लिहलं, आरआयपी मॅथ्यू पेरी, 'द फ्रेंड्स स्टार' हा एक उत्तम अभिनेता होता.
अल्कोहोलच्या व्यसनाशी करत होता संघर्ष : ओलिव्हिया मुननं पेरीचा ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या व्यसनाशी केलेला संघर्ष आठवत लिहलं. 'त्यानं व्यसन सोडण्यासाठी संघर्ष केला. तो प्रामाणिक आणि धाडसी होता. आज ही दु:खद बातमी मिळत आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली मॅथ्यू पेरी'. याशिवाय एक्सवरील 'फ्रेंडस' पेजवर त्याच्यासाठी एक संदेश लिहिला गेला आहे की, मॅथ्यू पेरीच्या निधनाबद्दल आम्ही खचून गेलो आहेत. तो आम्हा सर्वांसाठी एक चांगली व्यक्ती होता. आमचं मनं त्याच्या कुटुंबासोबत आहे, श्रद्धांजली'. 1994 ते 2004 मध्ये आलेला 'फ्रेंडस' हा शो प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. जेनिफर अॅनिस्टन, लिसा कुड्रो, डेव्हिड श्विमर यांच्यासोबत 'फ्रेंड्स' सोबत स्टारडम मिळवण्याआधी त्यानं अनेक शोमध्ये काम केलं होतं. फ्रेंड्स' हा शो न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या सहा मित्रांबद्दलचा शो होता. हा शो आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो बनला आहे.
हेही वाचा :
- Matthew Perry Death : फ्रेंड्स मालिकेतील अभिनेता मॅथ्यू पेरीचा टबमध्ये आढळला मृतदेह, लॉस एंजेलिस पोलिसांकडून तपास सुरू
- Karva Chauth 2023 : परिणीती चोप्रासह कियारा अडवाणीपर्यंत 'या' अभिनेत्री साजरा करणार पहिला करवा चौथ...
- dating reality show Temptation Island : डेटिंग रिअॅलिटी शो 'टेम्पटेशन आयलंड'चं होस्टींग करणार मौनी रॉयसोबत करण कुंद्रा