मुंबई :पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या एका असामान्य गृहिणीची कहाणी असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवत मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या एका असामान्य गृहिणीची कहाणी असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवत मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. समीक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली. प्रेक्षकांनीही 'गोष्ट एका पैठणीची'वर भरभरून प्रेम केले. 2022 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने 68व्या राष्ट्रीय पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवला. आता हा चित्रपट आणि त्याची सुंदर कहाणी प्रेक्षकांना कालपासून प्लॅनेट मराठीच्या ओटीटी वर पाहता येत आहे. प्रेक्षकांना 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट व्हि. ओ. डी. म्हणजेच व्हिडिओ ऑन डिमांड पाहता येणार आहे.
'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकले होते : प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवल्यामुळेच थिएटर बाहेर 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकले होते. 'गोष्ट एका पैठणीची'मधील इंद्रायणी महिला प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटली. घराघरातील ही कहाणी अनेकांना भावली. ज्यांचे इंद्रायणीला भेटायचे राहून गेले त्यांना आता 'गोष्ट एका पैठणीची’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे. अभिनेत्री सायली संजीव म्हणाली, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझ्या व्यक्तिरेखेत स्वतःला शोधल्याचे अनेकींनी सांगितले. माझ्यासाठी हा क्षण खूप मौल्यवान होता. आता 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सर्वात सुंदर भेट आहे. ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही त्यांना आता ओटीटीवर पाहता येणार आहे.