नवी दिल्ली : भारतातील चित्रपट निर्मात्यासाठी मालदीव हे चित्रीकरणासाठी अत्यंत आवडते ठिकाण आहे. या ठिकाणाची पर्यटकांनीदेखील भूरळ पडलेली, असते अशी परिस्थिती आहे. परंतु, गेले काही दिवसांपासून चीनच्या आपल्या 'इशाऱ्यावर' भारत आणि मालदीव यांच्यात तणाव होत आहे. हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया एआयसीडब्ल्यूए (AICWA)चे अध्यक्ष, सुरेश श्यामलाल यांनी दिलीय.
सुट्टीसाठी मालदीवला जाऊ नये : एआयसीडब्ल्यूए (AICWA)चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल म्हणाले, मालदीव सरकारनं भारत सरकारला 15 मार्चपर्यंत त्यांच्या बेटांवरून भारतीय सैन्य मागे घेण्यास सांगितलय. नुकतेच मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चुकीचे शब्द वापरले होते. त्यानंतर, मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड भारतात सुरू झाला होता. त्यानंतर भारतीय चित्रपट उद्योगाला आवाहन करतो की, मालदीवमध्ये (चित्रपट) शूट करू नये आणि कोणीही त्यांच्या सुट्टीसाठी मालदीवला जाऊ नये, असंही ते म्हणालेत.
सुंदरतेतही भर पडली : 'एक विलियन', 'मैने प्यार क्यूं किया' सारख्या चित्रपटांमध्ये मालदीवमधील जगाबाहेरची ठिकाणे टॅप केली आहेत. त्यांच्या चित्रिकरणाच्या सुंदरतेतही भर पडली आहे. परंतु, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांची कट्टरता, कोणताही विवेकपूर्ण विचार भारतीय दिग्दर्शक किंवा निर्मात्याला बेटावर जाण्यास प्रोत्साहित करेल अशी शक्यता नाही, असही ते म्हणालेत.
नेमकं काय आहे प्रकरण? :2 जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला पोहोचले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. त्यामध्ये, ते समुद्रकिनारी फिरताना दिसत आहेत. ही छायाचित्रे आणि व्हिडीओ शेअर करताना पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं भारतीय पर्यटकांना आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि लक्षद्वीपवर वक्तव्य करायला सुरूवात केली. त्यानंतर भारतातील जनतेने आक्षेप घेत मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केल्यावर मालदीवच्या सरकारने टीका करणाऱ्या तीन मंत्र्यांचे राजीनामे घेतले. पण नेमकं त्याचमुळे आता मालदीवची कोंडी होण्याची शक्यता आहे.