महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अरबाज खानने शुरा खानसोबत लग्न केल्यानंतर मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट - अरबाज खानच्या लग्नात सलमान खान

malaika arora first post after arbaaz khan wedding : माजी पती अरबाज खानने 24 डिसेंबर रोजी शुरा खानशी लग्न केल्यानंतर मलायका अरोराने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली. मलायकाने अरबाज आणि शुरा यांच्या लग्नाला हजर राहणे टाळले तर तिचा मुलगा अरहान खान वडिलाच्या लग्नात सहभागी झाल्याचे दिसले.

malaika arora first post after arbaaz khan wedding
मलायका अरोराने शेअर केली पहिली पोस्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 5:37 PM IST

मुंबई - malaika arora first post after arbaaz khan wedding अरबाज खानच्या शुरा खानसोबतच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायका अरोराने तिची पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. सोमवारी, तिने ख्रिसमसच्या उत्सवाच्या दरम्यान नव्या फोटोंसह तिच्या 18.7 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्सला आनंद दिला. तिने अरबाजशी 19 वर्षापूर्वी लग्न केले होते. त्यांचा संसार मोडल्यानंतर काही वर्षांनी अरबाज पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे.

मलायकाने "मेरी ख्रिसमस " असे कॅप्शन देऊन फोटोंच्या स्ट्रिंगसह ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. फोटोमध्ये तिने पांढरा पोशाख घातला आहे, केक धरलेला आहे तर उत्सवाच्या लाल रिबन्ससह ती खूप सुंदर दिसत आहे. तिचे सोशल मीडिया फीड भव्य डायनिंग टेबल स्प्रेड आणि उत्सवाच्या सजावटीने भरले आहे. विशेष म्हणजे, तिचा मुलगा अरहान खान एका फोटोत घरातील पाळीव प्राण्यासोबत आरामात वेळ घालवताना दिसत आहे.

मलायकाच्या उत्सवाच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अरबाज खानने दुसरे लग्न केल्याच्या पार्श्वभूमीवर मलायकाने पोस्ट शेअर केल्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले होते. मात्र ती ख्रिसमसचा आनंद घेण्यात मग्न दिसली.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्यातील विवाहाचे बंध 19 वर्षे टिकल होते. 1998 मध्ये त्यांचे मिलन झाले होते. मात्र, या जोडप्याने मार्च 2016 मध्ये त्यांचे विभक्त होण्याची घोषणा केली, मे 2017 मध्ये त्यांच्या घटस्फोटाला अंतिम रूप दिले. अरबाज खानने मेकअप आर्टीस्ट असलेल्या शुरा खानसोबत लग्न केले आहे. या लग्नाला मलायकाने पाठ फिरवली होती. मात्र तिचा मुलगा अरहान खान वडिलाच्या या दुसऱ्या लग्नात हजर होता. यावेळी तो नवीन सावत्र आई नववधू शुरा खानसोबत नाचतानाही दिसला. त्याचा चुलता सलमान खानसोबतही तो नृत्यात सहभागी झाला. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

हेही वाचा -

  1. 'मैं अटल हूं' चित्रपटातील देशभक्तीपर "देश पेहले" हे गाणं लॉन्च
  2. अरबाज खानच्या लग्नात सलमान खानचा नवविवाहित वधू आणि अरहान खानसोबत डान्स
  3. प्रभास आणि प्रशांत नीलच्या 'सालार'चा पहिल्या तीन दिवसात 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details