महाराष्ट्र

maharashtra

‘मजनू' मध्ये प्रेम, संघर्ष, सस्पेन्स, विरह यांसारखे अजूनही विविध पैलू मिळणार बघायला!

By

Published : May 9, 2022, 3:45 PM IST

सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित 'मजनू' चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा पार पडताना त्याची प्रदर्शन तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. टीझरमध्ये रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे (Majnu Movie trailor) एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत आहेत.

Majanu movie
Majanu movie

मुंबई :सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित 'मजनू' चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा पार पडताना त्याची प्रदर्शन तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. टीझरमध्ये रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत आहेत. "माझ्यासाठी तूच सोनं, नाणं, हिरे, मोती, धन दौलत ..." अशा संवादाने सुरु होणाऱ्या या टिझरमुळे "मजनू" हा चित्रपट एक तरल प्रेमकहाणी असेल असे स्पष्ट होत असले तरी नितीश चव्हाण, सुरेश विश्वकर्मा व सहकलाकार दिसतील.

'मजनू' बद्दल बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, 'मजनू' मध्ये प्रेम, संघर्ष, सस्पेन्स, विरह यांसारखे अजूनही विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत, तसेच चित्रपटातील गाणी श्रवणीय असून ती प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच भुरळ घालतील." 'मजनू' चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे, भारत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे-सानप असून कथा, पटकथा आणि संवाद गोवर्धन दोलताडे यांचे आहे. चित्रपटात नितीश चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

यांची होती प्रमुख् उपस्थिती
आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हा ट्रॅफिक डीसीपी राहुल श्रीरामे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या टिझर सोहळ्याला निर्माते गोवर्धन दोलताडे, भारत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे-सानप यांच्यासह दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, चित्रपटातील कलाकार सुरेश विश्वकर्मा, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे व तंत्रज्ञ उपस्थित होते. सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित 'मजनू' हा चित्रपट दि. १० जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -मुलगी इराच्या वाढदिवसाला आमिर खानने पहिली पत्नी रीना दत्तासह लावली हजेरी, फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details