महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Naal 2 : 'नाळ 2' चित्रपटावर महेश मांजरेकर फिदा, व्हिडिओतून केलं तोंडभरून कौतुक - महेश मांजरेकरची नाळ 2वर प्रतिक्रिया

Naal 2 : नागराज मंजुळेचा 'नाळ भाग 2' चित्रपटाचं चांगलेच कौतुक होत आहे. दरम्यान या चित्रपटाचे कौतुक करत महेश मांजरेकरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Naal 2
नाळ भाग 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 7:41 PM IST

मुंबई - Naal 2 : सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ भाग 2'ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट 6 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज झाला. मात्र या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद बॉक्स ऑफिसवर मिळत नाही. मात्र 'नाळ भाग 2' ज्यांनी पाहिला त्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही नाळ या चित्रपटाशी जोडली जात आहे. अनेक मराठी कलाकार सोशल मीडियावरून या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे, सोनाली खरे, प्रथमेश परब, प्रियदर्शन जाधव, विजय पाटकर, जयवंत वाडकर, विजू माने आणि स्मिता तांबे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

महेश मांजरेकर 'नाळ 2' चित्रपटावर फिदा :महेश मांजरेकरनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलंय की, अप्रतिम सिनेमा आहे 'नाळ 2'. अभिमान वाटला, की मराठीत असा चित्रपट तयार करण्यात आला. 'नाळ भाग 2' हा चित्रपट देशात सगळ्यांनी बघितला पाहिजे, असा त्याचा दर्जा आहे. या चित्रपटामध्ये तीन मुलांचे काम आहेत.'नाळ 2'ला अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकनं मिळतील. या चित्रपटातील चिमीची भूमिका साकारणाऱ्या त्या चिमुकलीला. मी सांगेन तिचं नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्ये न घेता ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’मध्ये घ्या,''अशा शब्दांत त्यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

'नाळ 2' चित्रपटाचं झालं कौतुक : मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर सध्या धमाल करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेल्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. नुकताच नागराज मंजुळे यांचा 'नाळ 2' हा देखील चित्रपट रुपेरी पडद्यावर कमाल करताना दिसत आहे. आदिनाथ कोठारेनं या चित्रपटाला उत्तम असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर स्मिता तांबेनं म्हटलं, 'एक अत्यंत अप्रतिम अनुभव आहे. हा चित्रपट संपूर्ण कुटुंब एकत्र जाऊन पाहू शकतं. नाळमध्ये अनेक हळव्या भावना आहेत. एखाद्या गावात चुकून कॅमेरा शिरला आहे, इतका नैसर्गिक अभिनय या पात्रांनी केला आहे. सुधाकर रेड्डी यंकट्टी, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजनं दिवाळीच्या निमित्तानं एक उत्तम कलाकृती बनवली आहे.

हेही वाचा :

  1. बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा मार्फ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  2. 'अ‍ॅनिमल'च्या प्रोमानं बुर्ज खलिफा उजळला, रणबीर कपूरनं बॉबी देओलसह दिली भेट
  3. कंगना राणौतनं चेन्नईत सुरू केलं सायकॉलॉजिकल थ्रिलरचं शूटिंग, आर माधवनसोबत होणार पुनर्मिलन

ABOUT THE AUTHOR

...view details