हैदराबाद - ज्येष्ठ अभिनेता आणि टॉलिवूड सुपरस्टार अभिनेता कृष्णा यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले आहे. 15 नोव्हेंबर रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज पहाटे २ वाजता श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. यातच त्यांची प्राणज्येत मालवली.
हे वर्ष महेश बाबूसाठी खूप कठीण गेले आहे, कारण सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांनी त्यांची आई गमावली आणि जानेवारीमध्ये त्यांनी आपला भाऊ रमेश बाबू गमावला होता आणि आता त्यांनी वडील गमावले आहेत.
सुपरस्टार कृष्णा यांचे पूर्ण नाव घटामनेनी शिव रामा कृष्णा आहे. तेलुगू सुपरस्टार महेश बाबूचे यांचे ते वडील आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण तेलुगू चित्रपटसृष्टी दु:खी झाली आहे आणि सेलिब्रिटी महेश बाबू आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कृष्णा यांना सोमवारी डॉक्टरांनी 20 मिनिटांनंतर पुनरुज्जीवित केले परंतु नंतर त्यांची तब्येत बिघडू लागली आणि 15 नोव्हेंबर रोजी पहाटे वयाच्या 79 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.