मुंबई :साऊथ सुपरस्टार महेश बाबू नेहमी आपल्या कुटुंबाबद्दल बोलत असतो. कुटुंबावरील प्रेमामुळे तो वारंवार चर्चेत देखील येत असतो. महेश बाबूला गौतम आणि सितारा घट्टमनेनी नावाची दोन मुले आहेत. तसेच अनेकदा महेश बाबू हा पत्नी नम्रता शिरोडकर कौतुक देखील करत असतो. महेश बाबूची मुलगी सितारा ही नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती तिचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. ती फार चांगली नृत्यांगना आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. दरम्यान आता सितारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सितारा ही वडील महेश बाबूला मिठी मारताना एका फोटोमध्ये दिसत आहे.
नम्रता शिरोडकर केला शेअर फोटो :नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर महेश बाबू आणि मुलगी सितारा हिचा एक फोटो पोस्ट केला, ज्यात ती वडील महेश बाबूला मीठी मारत आहे. या फोटोत पावसाळ्यात दोघे सकाळी चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. हा मनमोहक क्षण नम्रताने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. फोटो शेअर करताना नम्रताने लिहिले की, 'सकाळी मिठी मारणे आणि शाळेत जाणे (तीन हृदयाच्या डोळ्यांच्या इमोजीसह).' पुढे तिने लिहले 'हे सर्व प्रेमाबद्दल आहे (रेड हार्ट इमोजी). महेश बाबू हा साऊथ इंडस्ट्रीमधील टॉपचा अभिनेता असून त्याला आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे आवडते. अनेकदा महेश बाबू आपल्या कुटुंबासह दुसऱ्या देशात सुट्ट्यामध्ये जात असतो.