मुंबई- तेलगू स्टार महेश बाबूने मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची अमेरिकेत भेट घेतली. बिल गेट्स, महेश आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर यांनी एकत्र फोटोसाठी पोज दिली. महेश बाबूने बिल गेट्ससोबत स्वतःचा आणि पत्नी नम्रता यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि म्हटले, "मिस्टर बिल गेट्स यांना भेटून आनंद झाला! या जगाने पाहिलेल्या महान द्रष्ट्यांपैकी ते एक आहेत... आणि तरीही सर्वात नम्र! खरोखर एक प्रेरणादायी!!"
महेश बाबू सध्या अमेरिकेत सुट्टीवर आहेत. त्याची पत्नी आणि मुले गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सहलीतील फोटो पोस्ट करीत आहेत. महेश बाबूची सुट्टीतील फोटो काही काळापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहेत.