महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Mahesh Babu And Prabhas : बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी भिडणार 'गुंटूर करम' आणि 'कल्की एडी २८९८' - महेश बाबू

महेश बाबूचा 'गुंटूर करम' आणि प्रभासचा 'कल्की एडी '२८९८' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर २०२४ रोजी भिडणार आहे. हे चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी वाचा....

Mahesh Babu And Prabhas
महेश बाबू आणि प्रभास

By

Published : Aug 9, 2023, 12:26 PM IST

मुंबई : सुपरस्टार प्रभास आणि महेश बाबू यांच्यात २०२४मध्ये टक्कर होणार आहे. आज ९ ऑगस्ट रोजी, टॉलिवूडचा प्रिन्स महेश बाबूचा वाढदिवस असल्याने एक महत्वाची घोषणा झाली आहे. महेश बाबूचा आगामी अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'गुंटूर करम'च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर पॅन इंडिया चित्रपट 'कल्की एडी २८९८' देखील याच तारखेला रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता हे दोन्ही चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रभासचा 'कल्की एडी २८९८' आणि महेश बाबूचा गुंटूर करम हा चित्रपट कधी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, हे जाणून घेऊया...

चित्रपट कधी होणार प्रदर्शित : महेश बाबूचा आगामी चित्रपट 'गुंटूर करम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी महेश बाबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'गुंटूर करम' हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. या दोन्ही चित्रपटांची क्रेझ चाहत्यांमध्ये सारखीच आहे. दरम्यान आता प्रभासच्या 'कल्की एडी '२८९८' आणि महेश बाबूच्या 'गुंटूर करम' या चित्रपटाला १२ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर किती प्रतिसाद मिळतो हे पाहाणे महत्वपूर्ण ठरणार आहेत.

'कल्की एडी '२८९८' बद्दल :'कल्की एडी '२८९८' हा आगामी चित्रपट भारतीय महाकाव्य आणि विज्ञानकथा मल्टिस्टारर पॅन इंडियाचा चित्रपट आहे, ज्यात प्रभास आणि दीपिका मुख्य भूमिकेत असतील. यासोबतच अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार कमल हासन, दिशा पटानी आणि दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाग अश्विनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट ६०० कोटी आहे.

'गुंटूर करम' बद्दल :दुसरीकडे महेश बाबूच्या 'गुंटूर करम' या अ‍ॅक्शन-कॉमेडी-ड्रामा चित्रपट २०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केले आहे. या चित्रपटात श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, रम्या कृष्णन, प्रकाश राज आणि जगपती बाबू हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Kangana Ranaut Vs Javed Akhtar : अभिनेत्री कंगना प्रकरणात जावेद अख्तर यांची दिंडोशी सत्र न्यायालयात धाव; न्यायालयाने दिले कंगनाला निर्देश
  2. Sushmita Sen Queen : प्रियांका चोप्राने सुष्मिताला म्हटले 'क्वीन', का ते जाणून घ्या..
  3. Director Siddique Passes Away : मल्याळम दिग्दर्शक सिद्धीकी इस्माईल यांचे हृदयविकाराने निधन, 'बॉडीगार्ड' चित्रपटाने दिली होती ओळख

ABOUT THE AUTHOR

...view details