मुंबई- रणबीर कपूरसोबत पहिल्या अपत्याची अपेक्षा करणाऱ्या आलिया भट्टला अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेने एक सुंदर भेट पाठवली आहे. आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत माधुरीने नीतू कपूर यांच्यामार्फत आई-वडिलांना एक विचारपूर्वक भेट पाठवली. झलक दिखला जा 10 च्या आगामी एपिसोडमध्ये हा सुंदर क्षण राष्ट्रीय टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे.
डान्स रिअॅलिटी टीव्ही शो झलक दिखला जा 10 च्या आगामी एपिसोडमध्ये, ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर विशेष अतिथी म्हणून तिची उपस्थिती दर्शवताना दिसणार आहे. कलर्स टीव्हीने आगामी वीकेंड एपिसोडचा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये, शोची जज माधुरी नीतू कपूरचे आजी होणार असल्याबद्दल अभिनंदन करताना दिसत आहे. आलियासाठी माधुरीने नीतू कपूरला बाल गोपालची मूर्ती दिली.
"नीतू जी, आलिया आणि रणबीर आता विवाहित आहेत आणि आई-वडील होणार आहेत माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीतरी आहे. बाल गोपाल ", असे म्हणत माधुरीने बाल गोपालची मूर्ती नीतू यांना दिली. नीतू कपूरने मिठी मारून माधुरीच्या प्रेमळ भेटीला प्रतिसाद दिला.