महाराष्ट्र

maharashtra

Lawrence Bishnoi threatened Salman : लॉरेन्स बिश्नोईची सलमान खानला पुन्हा धमकी, समाजाने माफ केले नसल्याचा केला दावा

By

Published : Mar 15, 2023, 4:49 PM IST

पंजाबमधील सिद्धू मूसवाला हत्याकांडातील आरोपी लॉरेन्स बिश्नोई याने एका खासगी टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. याबाबत आता पंजाबच्या तुरुंगातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लॉरेन्स बिश्नोईची सलमान खानला पुन्हा धमकी
लॉरेन्स बिश्नोईची सलमान खानला पुन्हा धमकी

भटिंडा- पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोईला नुकतेच दिल्लीच्या तिहार तुरुंगातून पंजाबच्या भटिंडा तुरुंगात शिफ्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई याने मंगळवारी एका खासगी वाहिनीला थेट मुलाखत दिली. यानंतर तुरुंग व्यवस्थापनावर सुरक्षेबाबत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या मुलाखतीमुळे पंजाबच्या तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जेल अधिक्षकाचा खुलासा

सलमानला समाजाने माफ केलेले नाही- मुलाखतकाराने जेव्हा बिश्नोईला सलमानला धमकी दिली होती का असे विचारले तेव्हा तो होय म्हणाला. अद्यापही आमच्या समाजाने त्याला माफ केले नसल्याचे तो म्हणाला. काळविट हत्या प्रकरणी सलमान खानवर आरोप आहे आणि बिश्नोई समाज हरिणाला पवित्र मानतो. त्यामुळे हा राग अजूनही बिश्नोई समाजात आहे. सलमानने बिश्नोई समाजाचे बिकानेरजवळ असलेल्या मंदिरात जाऊन माफी मागावी. अथवा आमच्याकडून ठोस कारवाई होऊ शकते असेही बिश्नोई म्हणाला.

लॉरेन्स बिश्नोईचा खुलासा - सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी आपला काहीही संबंध नाही, असे बिश्नोई म्हणाला. तो म्हणाला की, मुसेवाला याने काँग्रेस पक्षातील आपली शक्ती वापरून अनेक मित्रपक्षांवर कारवाई केली. बिष्णोई पुढे म्हणतो की, त्याला हत्येच्या संपूर्ण कटाची माहिती होती, पण त्यात त्याची कोणतीही भूमिका नव्हती. गोल्डी ब्रार याने हे सर्व केले आहे. बिश्नोई यांनी असा युक्तिवाद केला की विकी मिधूखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या मृत्यूपूर्वी सिद्धू मुसेवाला यांच्याशी त्याचे कोणतेही वैर नव्हते. तो म्हणाा की, याआधीही तो सिद्धूची हत्या करू शकला असता. तथापि, सिद्धूशी त्याचे वैर विक्की मिदुखेरा आणि गुरलाल ब्रार यांच्या हत्येनंतरच झाले, कारण सिद्धू मुसेवाला त्यांच्या हत्येत सामील होता.

लॉरेन्स बिश्नोईने उपस्थित केला प्रश्न- लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की लोक आम्हाला गुन्हेगार आणि सिद्धू याला सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत. सिद्धूने कोणत्या देशासाठी काम केले आहे किंवा अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात आवाज उठवला आहे, ते सांगितले पाहिजे. सिद्धूमुळे आमच्या भावाचा मृत्यू झाला, असे तो म्हणाले. त्याची चौकशी का झाली नाही? सिद्धूला स्वतःला गुंड बनायचे होते.

भटिंडा कारागृह अधीक्षकांचे वक्तव्य- भटिंडा जेलचा व्हिडिओशी काहीही संबंध नाही. 8 मार्च रोजी जयपूरहून भटिंडा तुरुंगात आणलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर, तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले की ही मुलाखत पंजाबच्या बाहेरून घेण्यात आली होती. कारण भटिंडा मध्यवर्ती कारागृहात जॅमर लावण्यात आला आहे. मोबाईल इंटरनेट सेवा नाही. तुरुंग अधीक्षक एनडी नेगी सांगतात की, गुंड लॉरेन्स बिश्नोईला वेगवेगळ्या वेळी चौकशीसाठी घेऊन गेले जात होते. मुलाखत त्या वेळची असू शकते. लॉरेन्स बिश्नोई हा भटिंडा कारागृहात बंद असल्याचे तुरुंग अधीक्षकांचे म्हणणे आहे. त्याच्याकडे सध्या फोन नाही. त्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही त्यांन सांगितले.

हेही वाचा -Pathaan Completes 50 Days : पठाणचे ५० दिवस चित्रपटगृहात, Ottवर होणार प्रीमियर; हटवलेले सीन 'या' दिवशी दिसणार

ABOUT THE AUTHOR

...view details