महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Laal Singh Chaddha box office day 1आमिरचे १३ वर्षातील सर्वात कमी ओपनिंग पण रक्षाबंधनाला टाकले मागे - रक्षा बंधन ओपनिंग

लाल सिंग चड्ढा आणि रक्षा बंधन 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांच्या सुरुवातीच्या दिवसाचा व्यवसाय पाहता, दोन्हीपैकी एकाही चित्रपटाला मोठे यश मिळालेले नाही.

लाल सिंग चड्ढा आणि रक्षा बंधन
लाल सिंग चड्ढा आणि रक्षा बंधन

By

Published : Aug 12, 2022, 1:59 PM IST

Updated : Aug 12, 2022, 3:26 PM IST

मुंबई -सुपरस्टार आमिर खान ( Superstar Aamir Khan ) लाल सिंग चड्ढा ( with Laal Singh Chaddha ) या बहुप्रतीक्षित चित्रपटातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. अक्षय कुमारच्या ( Akshay Kumar ) रक्षा बंधनासोबत ( Raksha Bandhan ) हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाला. दोन्ही चित्रपटांच्या सुरुवातीच्या दिवसाचा व्यवसाय पाहता, दोन्हीपैकी एकाही चित्रपटाला मोठे यश मिळालेले नाही.

हॉलिवूड सुपरहिट 'फॉरेस्ट गंप'चा ( Forrest Gump ) रिमेक असलेल्या अद्वैत चंदन ( Advait Chandan ) दिग्दर्शित लाल सिंग चड्ढा चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाभोवती सोशल मीडियातून एक निगेटिव्ह वातावरण निर्माण करण्यात आले होते. या चित्रपटाचे आगाऊ तिकीट बुकिंग अक्षयच्या रक्षा बंधनहून अधिक होते.

ट्रेड रिपोर्ट्सनुसार, आमिरच्या लाल सिंग चड्ढाने पहिल्या दिवशी 10.75 कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदवला. गेल्या 13 वर्षांतील आमिरसाठी ही सर्वात कमी ओपनिंग असल्याचे म्हटले जाते. धक्कादायक म्हणजे, आमिरचा ठग्स ऑफ हिंदोस्तान हा हिंदी बॉक्स ऑफिस इतिहासातील सर्वात मोठा फ्लॉप मानला जातो. 2018 मध्ये रिलीज झाल्यानंतर, चित्रपटाने पहिल्या दिवशी 52 कोटींची कमाई केली होती.

अक्षयच्या 'रक्षाबंधन' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवली नाही. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट भाऊ आणि त्याच्या चार बहिणींच्या नात्यावर केंद्रित आहे. रक्षा बंधनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन फक्त 8 ते 8.50 कोटी रुपयांच्या दरम्यान घसरले आहे, तर ट्रेड एक्सपर्ट्स 10-12 कोटी रुपये कमाईची अपेक्षा बाळगून होते.

चित्रपटाच्या बजेटचा विचार करता लाल सिंग चड्ढाच्या निर्मितीसाठी १८० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर अक्षयचा रक्षा बंधन हा चित्रपट झी स्टुडिओ आणि दिग्दर्शक आनंद एल राय यांनी अंदाजे 70 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केला आहे. लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन यांना संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने दोन्ही चित्रपटांसाठी पहिला वीकेंड महत्त्वाचा असेल.

हेही वाचा -Shershah 1 Year : कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रासाठी लिहिली गूढ पोस्ट, चाहत्यांमध्ये संभ्रम

Last Updated : Aug 12, 2022, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details