मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओलला फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च केले आहे. सनी देओलने २४ जुलै रोजी मुलगा राजवीर देओलच्या बॉलिवूड डेब्यू चित्रपटाचे पोस्टर आणि आज २५ जुलै रोजी टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटात ८०च्या दशकातील अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रूपेरी पडद्यावर या दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. राजश्री प्रॉडक्शनने राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लॉन या २ स्टार किड्स लाँच केले आहेत. राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत राजवीर आणि पलोमा चित्रपट 'दोनो' बनवण्यात आला आहे. तसेच २०१९ मध्ये सनी देओलने त्याचा मोठा मुलगा करण देओलला पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे लॉन्च केले होते. करणची कारकीर्द विशेष राहिली नाही आणि चालू वर्षात लग्न करून तो स्थिरावला आहे. सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल आणि अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर वादग्रस्त अभिनेता कमाल आर खानला आता पोटदुखी होत आहे.
वादग्रस्त विधान : कमाल आर खान एका आता याबाबत एक वादग्रस्त ट्विट केले आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, राजश्री प्रॉडक्शनने आणखी दोन नेपो किडस् (Nepo Kids)ला राजवीर देओल आणि पलोमा ढिल्लन बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहेत, याचा अर्थ बॉलीवूडचे लोक कधीच सुधरणार नाहीत, लोक नेपो किडस् ( Nepo Kids)चा किती राग करतात हे माहित असताना देखील प्रतिभाहीन नेपो किडस् (Nepo Kids)ला हे लाँच करत आहेत.