मुंबई - Happy Birthday Prabhas : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास 23 ऑक्टोबरला त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करतोय. त्याला या खास प्रसंगी अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, प्रभासला क्रिती सेनॉननं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर अशी नोट त्याच्यासाठी लिहली आहे. या नोटमध्ये तिनं लिहलं, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभास !! तुला आनंद लाभो आणि तुझं जीवन उजळून निघो. तुला स्वादिष्ट अन्न नेहमी मिळो! तुझे येणारे वर्ष सर्वोत्तम जावो !!' अशी तिनं सदिच्छा दिली आहे. प्रभास आणि क्रिती अनेकदा त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. मात्र यांनी कधीही त्यांचं नात जगासमोर स्वीकार केलेलं नाही.
क्रिती सेनॉनला मिळला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :क्रिती सेनॉनला नुकताच 'मिमी'मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' मधील भूमिकेसाठी पुरस्कार जिंकणाऱ्या आलिया भट्टबरोबर तिनं हा पुरस्कार शेअर केला. अलीकडेच ती टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत अॅक्शन थ्रिलर 'गणपथ'मध्ये दिसली होती. यानंतर ती शाहिद कपूरसोबत रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती करीना कपूर खान, तब्बू आणि दिलजीत दोसांझसोबत 'द क्रू'मध्ये देखील असणार आहे. यावर्षी, तिनं तिच्या पहिल्या प्रोजेक्ट 'दो पत्ती'सह निर्मितीमध्येही पाऊल ठेवले आहे. कनिका धिल्लन दिग्दर्शित या चित्रपटात काजोल दिसणार आहे.
'आदिपुरुष'मध्ये प्रभास, क्रिती सेनॉन केलं काम : प्रभास अखेरचा 'आदिपुरुष'मध्ये क्रितीसोबत दिसला होता. तो सध्या तेलुगू अॅक्शन थ्रिलर 'सालार पार्ट 1' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट केजीएफ फेम प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला असून 22 डिसेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डंकी'शी टक्कर होणार आहे. याशिवाय तो 'कल्की 2898 एडी' या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी हे कलाकार दिसणार आहेत.