महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या हळदी समारंभात किरण राव मराठी लूकमध्ये उपस्थित - Kiran Rao

Ira Khan-Nupur Shikhare wedding: आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत 3 जानेवारीला महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार लग्न करणार आहे. दरम्यान 2 जानेवारी रोजी वराच्या घरी 'हळदी'चा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

Ira Khan-Nupur Shikhare wedding
इरा खान-नुपूर शिखरेचं लग्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 4:12 PM IST

मुंबई - Ira Khan-Nupur Shikhare wedding : अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत 3 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या आयराच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहेत. आमिर आणि रीना या दोघांचीही घरे दिव्यांनी सजली आहेत. दरम्यान, आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव देखील आयराच्या 'हळदी' समारंभासाठी नुपूर शिखरेच्या घरी दिसली. या कार्यक्रमात तिनं मराठी स्टाईलची साडी नेसली होती. यावर तिनं तिचे केस मोकळी सोडली असून एक सुंदर गजराला लावला होता. आयरा आणि नुपूर शिखरेचं लग्न हे महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार होणार आहे.

आमिर खानच्या मुलीचं लग्न : लग्नापूर्वी या जोडप्याचा 'हळदी'चा सोहळा पार पडला, ज्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सोशल मीडियावर आता काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये आमिर खानचं घर सजलेलं दिसत आहे. दरम्यान आयरा आणि नुपूर हे त्यांच्या लग्नानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे. या रिसेप्शनमध्ये चित्रपटसृष्टीतले सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या जोडप्याच्या लग्नाचे रिसेप्शन 10 जानेवारीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नुपूर हा आमिर खानचाही फिटनेस कोच राहिला आहे. आयरा आणि नुपूर तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ झाले व्हायरल :अनेकदा हे जोडपे एकत्र वेळ घालवताना दिसतात. आयरा तिचे आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. शेवटी हे दोघे त्यांचे नातं अधिकृत करत आहे. दरम्यान आमिरचे चाहते या बातमीमुळं खूप खुश आहेत. या जोडप्याचा साखरपुडा 18 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आयरा आणि नुपूरनं मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होती. हा कार्यक्रम भव्य झाला होता. या सोहळ्यात अभिनेत्री फातिमा सना शेख आणि इमरान खानदेखील उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. माधुरी दीक्षित-नेनेनं सहकुटुंब घेतलं सिद्धिविनायकांचं दर्शन
  2. करण जोहरनं रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं केलं कौतुक
  3. ज्युनियर एनटीआर जपानमधून सुखरुप परतला, सोशल मीडियावर व्यक्त केली भावना

ABOUT THE AUTHOR

...view details